• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात साडेपाच किलो गांजा जप्त ; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 6, 2025
in गुन्हे
0
जळगावात साडेपाच किलो गांजा जप्त ; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील मेहरुण तलाव परिसरात एमआयडीसी पोलिसांनी गांजाची वाहतूक करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्याकडून साडेपाच किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहरुण तलाव परिसरातील जे.के. पार्क भागातील उद्यानात एक व्यक्ती गांजाची वाहतूक करत आहे, या माहितीच्या आधारे पोलिसांनी उद्यानात पाहणी केली असता, एक व्यक्ती मोटारसायकलवर गांजा घेऊन उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी संशयित आरोपी मुकेश विष्णू अभंगे (वय ४२, रा. कंजरवाडा, जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एका मोठ्या गोणीत साडेपाच किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक विभागाला बोलावून नमुने तपासले. पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत ४० ते ५० हजार रुपये असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर, योगेश बारी, नितीन ठाकूर, राहुल घेटे, योगेश घुगे यांनी केली आहे. पुढील तपास सचिन नवले, चेतन पाटील करीत आहे.

Next Post
बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय बालकाचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय बालकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add