• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्ह्यात ७९ कॉपीबहाद्दरांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 26, 2025
in जळगाव जिल्हा
0
जिल्ह्यात ७९ कॉपीबहाद्दरांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : सध्या दहावी, बारावीच्या परिक्षा सुरु असून, या परीक्षांदरम्यान परीक्षा केंद्रावर कॉपी सारखे गैरप्रकार चालणार नाही. यासाठी शिक्षण विभागासह पोलिस प्रशासनाकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र, त्यातही अनेकजण कॉपी पुरविताना आढळून येतात. दरम्यान, जिल्हा पोलिस प्रशासनाकडून कॉपी पुरविणाऱ्या ७९ जणांवर आतापर्यंत कारवाई केली आहे.

कॉपीमुक्त अभियानासाठी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विद्यार्थ्यांना कॉपी पुरविणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शनिपेठ पोलिस ठाण्यात कॉपी पुरविणाऱ्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर परीक्षा केंद्राबाहेर विनाकारण फिरणाऱ्या २० ते २५ जणांना देखील पोलिसांनी ताकीद दिली आहे. कॉपी पुरवितांना कोणीही आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिला आहे.

जळगाव तालुक्यातील आसोदा येथील परीक्षा केंद्राबाहेर एका झेरॉक्सच्या दुकानावर उत्तर पत्रीकेची झेरॉक्स काढल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी गट शिक्षणाधिकारी सरला विजय पाटील यांच्या फिर्यादीवरुन प्रशांत झेरॉक्स या दुकान चालकावर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत पारोळा- २५, एरंडोल १७, यावल- १५, धरणगाव- ५, भडगाव- २, चाळीसगाव ग्रामीण- २, चाळीसगाव शहर- ३, मुक्ताईनगर-३, सावदा-३, वरणगाव- १, चोपडा ग्रामीण- १, पाचोरा- २ अशा एकूण ७९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

Next Post
महावितरणची वीज ग्राहकांकडे सुमारे २५० कोटी रुपयांची थकबाकी

महावितरणची वीज ग्राहकांकडे सुमारे २५० कोटी रुपयांची थकबाकी

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add