• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मधमाशांच्या हल्ल्यात पुजाऱ्याचा मृत्यू ! ; अमळनेर तालुक्यातील घटना

पूजेसाठी होम पेटविल्याने धुरामुळे उठले मोहळ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 7, 2025
in जळगाव जिल्हा
0
मधमाशांच्या हल्ल्यात पुजाऱ्याचा मृत्यू ! ; अमळनेर तालुक्यातील घटना

अमळनेर, (प्रतिनिधी) : मधमाशांच्या हल्ल्यात पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी साडेबारा वाजता जळोद ता. अमळनेर येथे नदी काठावर घडली. अमळनेर पोलीस स्टेशनला या घटनेची नोंद करण्यात आली आहे. अमोल शुक्ल (वय ३८, रा. पाठक गल्ली, अमळनेर) असे या पुजाऱ्याचे नाव आहे.

तालुक्यातील जळोद येथे बुधवारी डॉ. काकासाहेब देशमुख यांच्या अकराव्याची पूजा होती. ही पूजा नदी काठावरच करावी म्हणून पुजारी अमोल शुक्ल यांनी सांगितले होते. जळोद येथे नदी काठावर पुलाखाली स्व. देशमुख यांच्या मुली व मुलांसोबत पूजा सुरू होती. पूजेत होम पेटवला असता धूर झाल्याने पुलाखाली असलेल्या मधमाशांच्या पोळ्यापर्यंत धूर पोहचला आणि मधमाश्यांनी हल्ला करत पूजेला बसलेल्यांना चावल्या.

नंतर सर्व जण सैरावैरा पळू लागले. त्याचवेळी पुजारी अमोल शुक्ल यांनी सांगितले की, पळू नका, खाली झोपून घ्या, त्या चावणार नाहीत. आपण पळालो तर त्या आपल्याला चावतील, असे म्हणत ते खाली वाकले आणि सर्वात जास्त मधमाश्या त्यांनाच तोंडाला चावल्या. आधीच त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे जास्त त्रास होऊ लागला म्हणून उपचारासाठी त्यांना अमळनेर येथे आणत असताना रस्त्यात श्वास बंद पडून त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, इतर पाच ते सहा जणांनादेखील मधमाश्या चावल्याने त्यांचे अंग सुजले होते. त्यांना अमळगाव ग्रामीण रुग्णालयात आणून उपचार करण्यात आले. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

Next Post
विकास मल्हारा यांच्या अमूर्त चित्राला राज्य शासनाचा पुरस्कार !

विकास मल्हारा यांच्या अमूर्त चित्राला राज्य शासनाचा पुरस्कार !

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
खान्देश

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add