• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गावठी कट्टा आणल्याप्रकरणी पुण्यातील दोघांना चोपड्यात अटक

चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनची लासूर रस्त्यावर कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 4, 2025
in गुन्हे
0
गावठी कट्टा आणल्याप्रकरणी पुण्यातील दोघांना चोपड्यात अटक

चोपडा, (प्रतिनिधी) : पुणे येथील दोघा तरुणांना गावठी बनावटीच्या कट्ट्यासह ३ जिवंत काडतुसे घेऊन तस्करी करताना चोपडा ग्रामीण पोलिसांनी रंगेहाथ अटक केल्याची घटना हातेड-लासुर रस्त्यावर शनिवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान दोघा संशयितांकडून दुचाकीसह १ लाख ३७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांना चोपडा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना ३ दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.

मध्यप्रदेशातील पार उमर्टी येथून गावठी बनावटीचा कट्ट्यासह ३ जिवंत काडतुसे खरेदी करून पुणे जिल्ह्यात्तील दोन तरुण दुचाकी (क्रमांक एम एच-१२ आर आर-६६६०) ने सत्रासेंन, लासुर हातेडमार्गे चोपडाकडे येत असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे यांना मिळाल्याने त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन हातेड लासुर रस्त्यावर शनिवारी संध्याकाळी नाकाबंदी केली.

अंधारात लासुर गावाकडून येणारी दुचाकी क्रमांक (एम एच-१२आरआर-६६६०) आली असता पोलिसांनी दुचाकीस्वारांना अडवून झाडाझडती घेऊन नाव गाव विचारले. नौफील रब्बानी सैय्यद (वय २२, रा.सैय्यद नगर, हडपसर ता. जि. पुणे) व पाठीमागे बसलेला अजय अशोक वाघमारे (वय २४, रा. सलगर ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद, ह.मु. नेवाळे वस्ती चिखली ता. हवेली जि. पुणे) असे सांगितले. यावेळी दोघांकडून गावठी बनावटीच्या कट्ट्यासह ३ जिवंत काडतुसे आढळून आले.

दोघांना पोलिसांनी अटक करून बजाज कंपनीची पल्सर दुचाकी, गावठी बनावटी कट्टा व ३ जिवंत काडतुसे असा १,३६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या बाबत ग्रामीण पोलिसात दोघां संशयितांविरुध्द आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक, कविता नेरकर, चोपडा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे, पोना. शशिकांत पारधी, पोकॉ. किरण पारधी, विशाल पाटील, चेतन महाजन यांनी केली.

Next Post
रानडुकराच्या हल्ल्यात तरूण शेतकऱ्याचा मृत्यू ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

रानडुकराच्या हल्ल्यात तरूण शेतकऱ्याचा मृत्यू ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू
खान्देश

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू

January 15, 2026
कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन
जळगाव जिल्हा

कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन

January 15, 2026
जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group