• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जलतरण तलावात बुडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू !

जामनेर शहरातील सोनबर्डी येथील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 28, 2025
in जळगाव जिल्हा
0
जलतरण तलावात बुडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू !

जामनेर, (प्रतिनिधी) : शहरात सोयगाव तालुक्यातून आलेल्या व मामाकडे राहत असलेला १५ वर्षीय मुलगा जामनेर येथील सोनबर्डी येथे नगरपरिषदेच्या जलतरण तलावात मित्रांसोबत गेला होता. दरम्यान, पाण्यात पडून या मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी दि. २८ जानेवारी रोजी दुपारी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संकेत निवृत्ती पाटील (वय १५ वर्ष रा. घोसाळा ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर, ह. मु. हिवरखेडा रोड, जामनेर) असं मयत मुलाचे नाव आहे. तो परिवारासह राहत होता. जामनेर शहरात तो मामाकडे शिकण्यासाठी आलेला होता. संकेत हा ८ वी चा विद्यार्थी आहे. दरम्यान, जामनेर येथे सोनबर्डीच्या पायथ्याशी नगरपालिकेचा जलतरण तलाव आहे. तो बघण्यासाठी संकेत हा त्याच्या मित्रासोबत गेला होता. अचानक त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडायला लागला. तो दिसेनासा झाल्यामुळे नागरिकांनी तत्काळ जामनेर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली.

तर पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. आरोग्यदूत जालमसिंग राजपूत व सोबत एक तरुण यांनी संकेतला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु काही वेळाने संकेतचा मृतदेह हाती लागला, अशी माहिती मिळाली. कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. गेल्या दोन वर्षापासून बंद असलेल्या जलतरण तलावमध्ये नुकतेच पाणी भरण्यात आले होते. जलतरण तलाव चालू करण्यासाठी हे प्रयत्न होते. परंतु त्या अगोदर हि दुर्दैवी घटना घडली. या ठिकाणी कुठलेही सुरक्षारक्षक अथवा सुरक्षा व्यवस्था नसल्याने हि घटना घडल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

Next Post
सर्व वाहन धारकांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ३१ मार्च पुर्वी बसवणे बंधणकारक

सर्व वाहन धारकांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ३१ मार्च पुर्वी बसवणे बंधणकारक

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add