• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बहिणाबाई महोत्सवात बचत गटांनी केली अडीच कोटींची उलाढाल

छत्रपती संभाजीराजे पोवाड्याने कार्यक्रमाचा समारोप

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 27, 2025
in मनोरंजन
0
बहिणाबाई महोत्सवात बचत गटांनी केली अडीच कोटींची उलाढाल

जळगाव, (प्रतिनिधी) : भरारी फाउंडेशनतर्फे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या बहिणाबाई महोत्सवाचा सोमवारी सायंकाळी समारोप झाला. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीं संस्थांना बहिणाबाई विशेष सन्मानाने सन्मानीत करण्यात आले. डॉ. अमोल पाटील, डॉ. धीरज चव्हाण, विक्की राजपूत, डॉ.मंदार पंडीत, सिताराम महाजन, किरण सैंदाणे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यादरम्यान विविध बचत गटांची त्यांच्या मालाच्या विक्रीतून २ कोटी ६० लाखांची उलाढाल झाल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी सांगितले.

महोत्सवात बचत गटांनी विक्रीस ठेवलेले खाद्य पदार्थ, दैनंदिन गृहोपयोगी वस्तू यांना ग्राहकाची विक्रमी दाद या आर्थिक उलाढालीतून यंदा मिळाली. याठिकाणी सुक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने उद्योगांना चालना देण्यासाठी विविध उत्पादनांचे स्टॉल, खान्देश पर्यटनाचे दालन तसेच ॲक्युपंचर शिबीर विशेष आकर्षण ठरले.

समारोपप्रसंगी छत्रपती संभाजीनगरचे शाहीर सुमित धुमाळ व सहकारी यांनी छत्रपती संभाजीराजे पोवाडा सादर करत उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. यानंतर पाच दिवसीय बहिणाबाई महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड, अप्पर कोषागार अधिकारी कैलास सोनार, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे, जिल्हा दूध उत्पादक संघाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र मोरखेडे, बाळासाहेब सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2025/01/Untitled-45_720p.mp4

महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विनोद ढगे, सचिन महाजन, मोहित पाटील, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, विक्रांत चौधरी, सागर पगारीया, दिपक जोशी, मंगेश पाटील, अभिषेक बोरसे, आकाश भावसार, मंगेश पाटील, भूषण खंबायत यांनी परिश्रम घेतले सुत्रसंचलन विनोद ढगे यांनी केले.

Next Post
‘डीआरडीए’ कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्याची घरात गळफास लावून आत्महत्या

'डीआरडीए' कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्याची घरात गळफास लावून आत्महत्या

ताज्या बातम्या

चोपड्याच्या जिरायत पाडा येथे अंनिसतर्फे चमत्कारांचे सादरीकरण, प्रबोधन
जळगाव जिल्हा

चोपड्याच्या जिरायत पाडा येथे अंनिसतर्फे चमत्कारांचे सादरीकरण, प्रबोधन

January 18, 2026
एसटी प्रशासनाचा ‘रामभरोसे’ कारभार; डोळ्यासमोर बस असूनही चौकशी खिडकीतून प्रवाशांची दिशाभूल!
खान्देश

एसटी प्रशासनाचा ‘रामभरोसे’ कारभार; डोळ्यासमोर बस असूनही चौकशी खिडकीतून प्रवाशांची दिशाभूल!

January 18, 2026
जळगावात २३ जानेवारीपासून ‘बहिणाबाई महोत्सवा’चा जागर; खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची मेजवानी
खान्देश

जळगावात २३ जानेवारीपासून ‘बहिणाबाई महोत्सवा’चा जागर; खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची मेजवानी

January 18, 2026
“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे
खान्देश

“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे

January 17, 2026
आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय
जळगाव जिल्हा

आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय

January 17, 2026
भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता
जळगाव जिल्हा

भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता

January 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group