• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हौदाच्या पाण्यात बुडून उच्चशिक्षित तरुणीने केली आत्महत्या

जळगाव तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 27, 2025
in गुन्हे
0
हौदाच्या पाण्यात बुडून उच्चशिक्षित तरुणीने केली आत्महत्या

जळगाव, (प्रतिनिधी) : हौदामधील पाण्यात झोपून एका ३१ वर्षीय अभियांत्रिकी शिक्षण झालेल्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दि.२५ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कानळदा येथे घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रियंका रवींद्र भंगाळे (३१, रा. कानळदा, ता. जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. तरुणीच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. या तरुणीचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले असून ती मध्यंतरी पुणे येथे नोकरीलादेखील होती. दोन वर्षांपूर्वी ती गावी परतली व आई-वडिलांसोबत राहत होती. शनिवारी सकाळी घराच्या मागे गुरांच्या गोठ्यानजीक असलेल्या पाण्याच्या हौदात असलेल्या पाण्यात झोपून तिने आपले जीवन संपविले.

काही वेळाने तिचे काका गोठ्याकडे गेले, त्या वेळी त्यांना तरुणी पाण्यात बुडलेल्या अवस्थेत दिसली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तीला मयत घोषित केले. पोलिस पाटील नारायण पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्या वेळी पोहेकॉ अनिल फेगडे, संजय भालेराव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 


 

Next Post
अल्पवयीन तरुणीवर पळवून नेत बलात्कार !

अल्पवयीन तरुणीवर पळवून नेत बलात्कार !

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई
गुन्हे

विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई

August 27, 2026
पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पातोंडा शिवारातून खताच्या बॅगा लांबवणारी टोळी जेरबंद ; ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 27, 2026
कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!
गुन्हे

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!

August 27, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 26, 2026
वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add