• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बहिणाबाई महोत्सवात रविवारी रेकॉर्ड ब्रेक गर्दी

लावणी महाराष्ट्राची' व 'भारत गौरव पर्व' ने जळगावकर मंत्रमुग्ध

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 27, 2025
in मनोरंजन
0
बहिणाबाई महोत्सवात रविवारी रेकॉर्ड ब्रेक गर्दी

जळगाव, (प्रतिनिधी) : भरारी फाउंडेशनतर्फे सागर पार्कवर सुरू असलेल्या बहिणाबाई महोत्सवात रविवारी जळगावकरांना एक वेगळा अनुभव मिळाला. विविध कार्यक्रमांसह बाल कलावंतांच्या लावणी, महाविद्यालयीन कलाकारांचे भरतनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रमांनी रविवारची सायंकाळ चांगलीच रंगली होती.

बहिणाबाई महोत्सव रविवारी रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा ठरला. यातच शाहीर मीरा दळवी व सहकारी यांचा ‘लावणी महाराष्ट्राची’ व प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध गायक रवींद्र खोमणे यांचा ‘भारत गौरव पर्व’ हे कार्यक्रम रविवारी खास आकर्षण होते.

तसेच यावेळी बहिणाबाई जीवनगौरव पुरस्काराने दलीचंद जैन, रजनीकांत कोठारी यांना तर वैद्यकीय, सामाजिक व औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत विशेष योगदान देणारे डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, डॉ. नंदा जैन, डॉ. पी. आर चौधरी, भालचंद्र पाटील, अनिल कांकरिया यांना मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी आमदार सुरेश भोळे, जैन उद्योग समूहाचे अशोक जैन यांनी बहिणाबाई महोत्सवाच्या दहाव्या पर्वाला शुभेच्छा दिल्या. आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,नाबार्ड चे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे, भालचंद्र पाटील, सचिन महाजन, सागर पगारीया, मोहित पाटील, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, अभिषेक बोरसे, विक्रांत चौधरी, आकाश भावसार, मंगेश पाटील आदींची उपस्थिती होती.

आज सोमवारी सायंकाळी समारोप
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारी शाहीर सुमित धुमाळ यांच्या शाहीर महाराष्ट्राचा प्राण या पोवाड्याचे आयोजन करण्यात आले असून पाच दिवसीय महोत्सवाचा सोमवारी सायंकाळी समारोप होईल असे दीपक परदेशी आणि विनोद ढगे यांनी सांगितले.

Next Post
हौदाच्या पाण्यात बुडून उच्चशिक्षित तरुणीने केली आत्महत्या

हौदाच्या पाण्यात बुडून उच्चशिक्षित तरुणीने केली आत्महत्या

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add