• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आयुष्याचा बेरंग होण्यापूर्वीच वृध्द पेंटरवर यशस्वी शस्त्रक्रिया

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ञांकडून उपचार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 21, 2025
in आरोग्य
0
आयुष्याचा बेरंग होण्यापूर्वीच वृध्द पेंटरवर यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव, (प्रतिनिधी) : पेंटींग काम करून सर्वसामान्यांच्या आयुष्यात रंग भरणार्‍या ६५ वर्षीय पेंटरला अपघात झाल्याने हातापायाची ताकद गेली होती. त्यामुळे त्याला भविष्याची मोठी चिंता लागली होती. मात्र आयुष्याचा बेरंग होण्यापूर्वीच या वृध्द पेंटरवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला भविष्यातील चिंतेतून मुक्त केले.

याबाबत माहिती अशी की, सुभाष कानडे (वय ६५) हे पेंटींग काम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवितात. एकेदिवशी पेंटींगचे काम करतांना अचानक ते खाली कोसळले. या अपघातामुळे त्यांच्या हाता पायाची ताकद नाहीसी झाली होती. अशा परीस्थितीत त्यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी मेंदू व मणका विकार तज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी कानडे यांची एमआरआय तपासणी केली. त्यात सी-७ मध्ये कॉर्ड कन्फ्युजन होते. तसेच कानडे यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराचा देखिल त्रास होता.

त्यामुळे शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे होते. तसेच त्यांना शारीरीक संवेदना देखिल नव्हत्या. अशा परीस्थितीत शस्त्रक्रिया करणे हे एक मोठे आव्हानच होते. अशा गुंतागुंतीच्या परीस्थितीतही विभागप्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मेंदू व मणका विकार तज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी आपला अनुभव अन् कौशल्य पणाला लावत भूल देत त्यांच्यावर सी ४,५,६ डी १, डी २ फिक्सेशन विथ सी -७ लॅमिनोटोमीची शस्त्रक्रिया केली. तब्बल पाच तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या आठवडाभरात त्यांच्या हातापायाची ताकद पुर्ववत होऊ लागली होती. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतंर्गत मोफत करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी डॉ. अर्शिल, डॉ. अपूर्वा, भूलशास्त्र तज्ञ डॉ. सतीश यांनी सहकार्य ेकले. शस्त्रक्रियेमुळे सुभाष कानडे यांचे आयुष्य बेरंग होण्यापूर्वीच पुन्हा एकदा उत्साहाने ते कामाला लागले.

Next Post
मित्रानेच केला मित्राचा संसार उध्वस्त ; पाटचारीत उडी घेऊन एकाने संपविली जीवनयात्रा

मित्रानेच केला मित्राचा संसार उध्वस्त ; पाटचारीत उडी घेऊन एकाने संपविली जीवनयात्रा

ताज्या बातम्या

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

June 2, 2026
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!
जळगाव जिल्हा

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

June 2, 2026
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group