• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राज्यातील पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या जाहीर

जळगाव जिल्ह्याची धुरा पुन्हा गुलाबराव पाटलांकडे

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 18, 2025
in महाराष्ट्र
0
राज्यातील पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या जाहीर

जळगाव, (प्रतिनिधी) : अनेक दिवसांपासून रखडलेल्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या आज शनिवारी सायंकाळी जाहीर झाल्या आहेत. यात जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी गुलाबराव पाटील असून गिरीश महाजन यांना नाशिक जिल्हा मिळाला आहे. त्याच प्रमाणे पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झालेले संजय सावकारे यांना भंडारा जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मंत्रीपदांचा शपथविधी होऊन गेला होता. मात्र अद्याप पर्यंत पालकमंत्री पदांची यादी जाहीर झाली नव्हती. दरम्यान पालकमंत्री पदाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे.

या यादीनुसार जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामुळे आता पाच वर्षांपेक्षा पुढील कालावधीत देखील गुलाबराव पाटील यांच्याकडेच जळगाव जिल्ह्याची धुरा असेल हे आता स्पष्ट झाले आहे.

राज्यातील सर्व पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी पुढीलप्रमाणे आहे

▪️देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) – गडचिरोली
एकनाथ शिंदे – (उपमुख्यमंत्री) – ठाणे, मुंबई शहर
अजित पवार – (उपमुख्यमंत्री) – पुणे, बीड
चंद्रशेखर बावनकुळे – नागपूर, अमरावती
राधाकृष्ण विखे पाटील – अहिल्यानगर
हसन मुश्रिफ – वाशिम
चंद्रकांत पाटील – सांगली
गिरीश महाजन – नाशिक
गणेश नाईक – पालघर
गुलाबराव पाटील – जळगाव
संजय राठोड – यवतमाळ
आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा (सहपालकमंत्री) मुंबई उपनगर
उदय सामंत – रत्नागिरी
जयकुमार रावल – धुळे
पंकजा मुंडे – जालना
अतुल सावे – नांदेड
अशोक उईके – चंद्रपूर
शंभुराज देसाई – सातारा
अदिती तटकरे – रायगड
शिवेंद्रराजे भोसले – लातूर
माणिकराव कोकाटे – नंदूरबार
जयकुमार गोरे – सोलापूर
नरहरी झिरवळ – हिंगोली
संजय सावकारे – भंडारा
संजय शिरसाट – छत्रपती संभाजीनगर
प्रताप सरनाईक – धाराशिव
मकरंद जाधव – बुलढाणा
नितेश राणे – सिंधुदुर्ग
आकाश फुंडकर – अकोला
बाबासाहेब पाटील – गोंदिया
प्रकाश आबिटकर व माधुरी मिसाळ (सहपालकमंत्री)- कोल्हापूर
आशिष जयस्वाल (सहपालकमंत्री) – गडचिरोली
पंकज भोयर – वर्धा
मेघना बोर्डीकर – परभणी


 

Next Post
जि.प. शिक्षकांनी ड्रेस कोडचा वापर करण्याची गरज.. – मंत्री गुलाबराव पाटील

जि.प. शिक्षकांनी ड्रेस कोडचा वापर करण्याची गरज.. - मंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

मंदिराच्या पुजाऱ्याची हल्लेखोरांकडून हत्या; भुसावळात खळबळ
गुन्हे

मंदिराच्या पुजाऱ्याची हल्लेखोरांकडून हत्या; भुसावळात खळबळ

June 29, 2026
उसनवारीचे पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून महिलेवर कारमध्ये अतिप्रसंग; जळगावातील धक्कादायक घटना
गुन्हे

उसनवारीचे पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून महिलेवर कारमध्ये अतिप्रसंग; जळगावातील धक्कादायक घटना

June 29, 2026
२२ चोरीच्या मोटार सायकलींसह ४ जणांना अटक; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त!
Uncategorized

२२ चोरीच्या मोटार सायकलींसह ४ जणांना अटक; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त!

June 29, 2026
अवघ्या ५ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड, दोन सराईत चोरट्यांकडून ६३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
गुन्हे

अवघ्या ५ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड, दोन सराईत चोरट्यांकडून ६३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

June 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
महाराष्ट्र

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 28, 2026
शिरसोलीत जीर्ण सार्वजनिक शौचालयाच्या त्रासामुळे नागरिक आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा
जळगाव जिल्हा

शिरसोलीत जीर्ण सार्वजनिक शौचालयाच्या त्रासामुळे नागरिक आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

June 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group