किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याची रक्कम आता डी.बी.टी.द्वारे लाभार्थ्यांचे खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.
जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी योजनेतील सर्व लाभार्थ्यांची खाती आधार सलग्न करणे आवश्यक असून सदरचे कामकाज हे तातडीने पूर्ण करणे बाबत निर्देश दिले आहेत. या करिता संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ याजनेतील बैंक पासबुक/आधार कार्ड / लाभार्थ्यांची जन्म तारीख वय त्यांचा जातीचा संवर्ग तसेच त्यांचा मोबाईल क्रमांक, लाभार्थ्यांचे दिव्यांग असल्यास त्यांचे प्रमाणपत्र व किती टक्के अपंग आहे. त्यांचे उत्पन्न किती आहे. याबाबत लाभार्थ्यांची माहिती सादर करावयाची आहे. माहे जानेवारी २०२५ अखेर पावेतो सदर लाभार्थ्यांची माहिती ऑनलाईन भरावयाची आहे.
जामनेर तालुक्यातील एकूण १३००० लाभार्थ्यांपैकी अद्याप ६००० लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करणे बाकी आहे. त्यामुळे तालुक्यातील खालील गावांमध्ये लाभार्थी माहिती गोळा करण्यासाठी ठिकठिकाणी कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर दिवशी संबंधित ग्राममहसूल अधिकारी, महसूल सेवक व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी तसेच संजय गांधी योजना शाखा अधिकारी व कर्मचारी देखील कॅम्प ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
तरी गावातील लाभार्थ्यांनी आवश्यक ती माहिती तातडीने आपले गावचे तलाठी यांचेकडे न चुकता जमा करावी असे आवाहन जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी केले आहे.
VIDEO