• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सामाजिक सौहार्द जपण्यासाठी रावेर पोलीस ठाण्याचा अभिनव उपक्रम

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 13, 2025
in जळगाव जिल्हा
0
सामाजिक सौहार्द जपण्यासाठी रावेर पोलीस ठाण्याचा अभिनव उपक्रम

जळगाव, (जिमाका) : पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सामाजिक सलोखा आणि सर्वधर्म समभाव वाढवण्यासाठी रावेर पोलीस ठाण्याच्या वतीने “एकता क्रिकेट कप २०२५” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचा उद्देश विविध धर्मीयांमध्ये ऐक्य, सलोखा आणि परस्पर सामंजस्य वाढवणे हा होता.

क्रिकेटच्या माध्यमातून एकतेचा संदेश..
रावेर येथील व्ही.एस. नाईक कॉलेजच्या मैदानावर या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले. यात रसलपुर रॉयल, वाघोड वॉरियर्स, रावेर टायगर्स, पाल रॉयल, के-हाळा फायटर्स आणि होमगार्ड पोलीस पाटील पत्रकार अशा सहा संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामन्यात रसलपुर रॉयल संघाने वाघोड वॉरियर्स संघावर विजय मिळवत “एकता क्रिकेट कप २०२५” जिंकला.

संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. रितेश पवारने “मॅन ऑफ द मॅच” आणि “मॅन ऑफ द सिरीज” दोन्ही किताब पटकावले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अतुल विंचुरकर तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मुजाहिद यांना गौरविण्यात आले.

प्रमुख उपस्थिती आणि सहकार्य..
या उपक्रमाचे उद्घाटन जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी श्री.अंकीत यांच्या हस्ते झाले. सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, तहसीलदार बंडु कापसे, गटविकास अधिकारी खेमचंद वानखेडे आणि विविध धर्मीय प्रतिष्ठित नागरिकांनी या उपक्रमाला हजेरी लावली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उप निरीक्षक घनश्याम तांबे, पोलिस हेड कॉनिस्टेबल विठ्ठल देशमुख, पोलिस नाईक पुरुषोत्तम पाटील आणि पोलिस कॉनिस्टेबल नितीन सपकाळे यांनी विशेष मेहनत घेतली.

सामाजिक सलोखा वाढवण्याचा आदर्श उपक्रम..
रावेर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित “एकता क्रिकेट कप” हा सामाजिक सलोखा जपण्यासाठी एक उत्कृष्ट उदाहरण ठरला आहे. या उपक्रमामुळे समाजातील विविध घटकांमध्ये एकात्मतेचा संदेश पोहोचला असून नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Next Post
गणेशवाडीत श्रीमद भागवत कथेत गोपाळकाल्याचे किर्तन

गणेशवाडीत श्रीमद भागवत कथेत गोपाळकाल्याचे किर्तन

ताज्या बातम्या

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद
खान्देश

समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद

January 12, 2026
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात
खान्देश

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात

January 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group