जळगाव, (प्रतिनिधी) : दहशत वाजविण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगून फिरत असलेल्या एकास भडगाव शहरातून अटक करण्यात आली. यात आकाश झुंबर कांबळे (रा. वरची बर्डी, यशवंतनगर, भडगाव) आणि शुभम भास्कर दौणे (रा. रेल्वे स्टेशन जवळ कजगाव ता. भडगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भडगाव येथे जाऊन ही कारवाई करण्यात आली.
भडगाव शहरात आकाश कांबळे हा दहशत माजविण्याच्या उद्दीष्टाने त्याचे कब्ज्यात गावठी कट्टा (पिस्टल) वापरत असल्याचे बातमी मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने भडगाव येथे जावून मिळालेल्या बातमीची खात्री करून यशवंत नगर भडगाव येथून आकाश कांबळे यास ताब्यात घेवून त्याच्याजवळ गावठी बनावटीचा कट्टा (पिस्टल) मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. सदरचा गावठी कट्टा (पिस्टल) कोठून घेतली याबाबत अधिक विचारपुस केली असता त्याने सांगीतल्या प्रमाणे कजगाव येथील शुभम भास्कर दौणे यास ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यांच्या कडून २५०००/- रु किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा (पिस्टल) जप्त करून त्यांचे विरुध्द भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोह प्रविण भालेराव, महेश पाटील, ईश्वर पाटील, सागर पाटील, दिपक चौधरी जळगाव यांनी केली आहे.