• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बोलेरो कारच्या धडकेतील जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 28, 2024
in जळगाव जिल्हा
0
बोलेरो कारच्या धडकेतील जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) : पिंपळे फाटाजवळुन धरणगावकडे जात असताना भरधाव बोलेरो पिकअपने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले होते. एका जखमीची येथील खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान १८ रोजी रात्री ८ वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बोलेरो चालकाविरुध्द बुधवार,२५ रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

नवल सुरसींग भील (३५, रा.काझीपुरा, ता.चोपडा) असे मृत तरूणाचे नाव आहे. नवल भील तसेच त्यांचा मित्र मंगल मुलचंद भील हे गुरुवार ५ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास चोपडा धरणगाव रोडवर पिंपळे फाट्याजवळून दुचाकी (क्रमांक एम.एच.१९ ए.ए.८५०८) ने धरणगाव येथे जात होते. त्यांच्या मागुन भरधाव बोलेरो पिकअप (क्रमांक एम.एच.१९ सी.के.१२४५) ने धडक दिली. या अपघातामध्ये नवल भील यांच्या डोक्याला आणि पोटाला जबर दुखापत झाली. प्राथमिक उपचाराअंती नवल भील याना जळगाव येथे खाजगी रूग्णालयात दाखल केले होते.

अतिदक्षता विभागात उपचार घेत असताना बुधवार १८ रोजी त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली. उपचाराला प्रतिसाद देवू न शकल्याने रात्री ९.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी पंचनामा केला. या प्रकरणी बोलेरो चालकाविरुध्द धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्सटेबल चंदूलाल सोनवणे हे करीत आहेत.

Next Post
संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमीत्त ओझर बु.ला महाआरती

संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमीत्त ओझर बु.ला महाआरती

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add