जळगाव, (प्रतिनिधी) : येथील संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रातील आजी-आजोबा यांना शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी एक दिवसीय सहल नुकतीच आयोजित करून एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
दरम्यान आजी-आजोबांना गजानन महाराजांचे दर्शन घेऊन खूप आनंद झाल्याचा भावना व्यक्त केल्या. यावेळी आजी-आजोबांनी गजानन महाराजांचे दर्शन घेत प्रसादाचा आस्वाद घेतला. या हसलीसाठी माजी जि.प. सदस्य प्रताप गुलाबराव पाटील व उद्योजक धनराज कासाट यांनी विशेष सहकार्य केले.
सहलीचे जाण्यापासून ते येण्यापर्यंतचे नियोजन पत्रकार सोनम पाटील यांनी केले होते. दरम्यान, या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच आश्रमातील मनोज कुलकर्णी , शितल काटे , हर्षल वंजारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त निर्मला गायकवाड, सहाय्यक उपायुक्त अश्विनी गायकवाड, शहर अभियान व्यवस्थापक गायत्री पाटील यांच्या मार्गदर्शनात प्रशांत गायकवाड सर, डॉ.फारुख पटेल, बेगर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी, काळजीवाहक शितल काटे, राजेंद्र मराठे, हर्षल वंजारी यांनी सहकार्य केले.