मित्राच्या घरातूनही सापडली एक गावठी पिस्टल
जळगाव, (प्रतिनिधी) : एअरगन बाळगत दहशत वाजवणाऱ्या एका तरुणास शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातून अटक करण्यात आली आहे. अधिक चौकशी केले असता त्याच्या मित्राकडे देखील एक पिस्टल असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. शुभम अनंता राउत (वय २१, रा. भगवाचौक, सुप्रिम कॉलनी, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना सुप्रीम कॉलनी परिसरात एक तरुण हा अग्निशस्त्र बागळुन परीसरात दहशत पसरवीत असल्याची गोपनीय माहीती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, छगन तायडे, गणेश ठाकरे, शिद्धेश्वर डापकर यांच्या पथकाने सुप्रीम कॉलेज जात शुभम राऊत याची हंग झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्ट्यासारखे दिसणारी एअरगन मिळून आली.
मित्राच्या घरातूनही सापडली एक गावठी पिस्टल..
शुभम याला विश्वासात घेवुन चौकशी केली असता जळगाव शहरातील तायडे गल्लीत राहणारा बंटी तायडे याच्या कडे एक पिस्टल दिली असल्याचे त्याने सांगितले. बंटी तायडे चा लागलीच शोध घेतला असता तो घरी मिळुन आला नाही. दरम्यान पंचांनसमक्ष त्याच्या घरातुन एक गावठी बनावटीची पिस्टल मिळुन आली आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधीकारी संदीप गावीत आदी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
संबंधितांविरूद्ध एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन येथे गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात शुभम राउत यास अटक करण्यात आली असुन त्याचा साथीदार बंटी तायडे याचा शोध पोलीस घेत आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.उप.निरी. चद्रकांत धनके सोबत पो.काँ योगेश घुगे हे करीत आहे.