मैत्र महोत्सवाचे आयुष प्रसाद व डॉ इंद्रानी मिश्रा यांच्या हस्ते उद्घाटन
जळगाव, (प्रतिनिधी) : परिवर्तनचा मैत्र महोत्सव हा नऊ दिवसांचा महोत्सव जळगावची ओळख आहे. कला ही महत्वाची असते असे मनोगत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उद्घाटन प्रसंगी आपल्या मनोगतात व्यक्त केले. याप्रसंगी डॉ इंद्रानी मिश्रा, डॉ अविनाश जोशी, हिना अविनाश जैन, प्रकाश पाटील, नंदू अडवाणी, अनिस शहा, अनिल कांकरिया, स्वरुप लूंकड, मानसी गगडाणी, विनोद पाटील, नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मानसी गगडानी यांनी केले.
नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची सुरवात “इश्क पर जोर नही” कार्यक्रमाने करण्यात आली. हृदयात बसलेल्या हिंदी गाण्यांचा संगीतमय प्रवास शंभू पाटील यांनी उलगडून सांगितला. यात छाप तिलक, मेरा रंग दे, ए मेरे वतन के लोगो, आज जाने कि जिद, लंबी जुदाई, ये दिल तुम बिन या गितांसोबत कवी गुलजार यांच्या तुझ से नाराज नही, आपकी आखो, तुजसे नाराज नही, मेरा कुछ सामान, मेरे डोलना, यासारखी अनेक गीते परिवर्तनच्या वरून नेवे, श्रुती जोशी, रजनी पवार, गोविंद मोकाशी या गायकांनी गाणी सादर केली.
कलावंत जयश्री पाटील व डॉ. सोनाली महाजन यांनी कवितांचे सादरीकरण केले. साथसंगत राहुल कासार , अक्षय दुसाने, रोहित बोरसे, यश महाजन या कलावंतांनी केली. महोत्सवाला भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमाला अविनाश जैन, किरण बच्छाव, डॉ. राहुल महाजन, शिवाजी पवार, अमर कुकरेजा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे दिग्दर्शन मंजुषा भिडे यांचे तर संगीत दिग्दर्शन सुदिप्ता सरकार यांचे होते.