• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षीय बालकाचा मृत्यू ; पाचोरा शहरातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 14, 2024
in जळगाव जिल्हा
0
ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षीय बालकाचा मृत्यू ; पाचोरा शहरातील घटना

पाचोरा, (प्रतिनिधी) : शहरातील भडगाव रोडवरील शक्तीधामनजीक भयानक अपघात घडल्याचा प्रकार समोर आलायं. ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून एका १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील राजीव गांधी काॅलनीत जितेंद्र गोसावी हे पत्नी, दोन मुले, वृद्ध आईसह वास्तव्यास आहेत. जितेंद्र गोसावी यांचा मोठा मुलगा रुद्र जितेंद्र गोसावी (वय १०) हा येथील पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयात इयत्ता तिसरीत शिक्षण घेत होता. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर रुद्र हा सायकल घेऊन शक्तीधामच्या दिशेने खेळण्यासाठी जात होता. तेवढ्यात समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरला बघुन रुद्रचा सायकलीवरील तोल गेल्याने रुद्र थेट ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडुन त्याच्या डोक्याचा अक्षर:शा चेंदामेंदा झाला.

सदरचा प्रकार रुद्र याच्या आई, वडिलांना कळताच त्यांनी एकच हंबरडा फोडत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरुन रुद्रचा मृतदेह नागरिकांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये जितेंद्र गोसावी यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक विजय उर्फ बबलु अशोक थोरात (रा. पुनगाव ता. पाचोरा) याचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार पांडुरंग सोनवणे हे करीत आहे.

Tags: accident
Next Post
हायटेक शेतीचा नवा हुंकार ; जैन हिल्सवर कृषि महोत्सवाची उत्साहात सुरवात

हायटेक शेतीचा नवा हुंकार ; जैन हिल्सवर कृषि महोत्सवाची उत्साहात सुरवात

ताज्या बातम्या

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!
खान्देश

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!

December 2, 2025
यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!
खान्देश

यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!

December 2, 2025
अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!
खान्देश

अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!

December 2, 2025
वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!
खान्देश

वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!

December 2, 2025
शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन

December 1, 2025
कामगारांना मतदानासाठी ‘भरपगारी सुट्टी’ अनिवार्य: आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार!
खान्देश

कामगारांना मतदानासाठी ‘भरपगारी सुट्टी’ अनिवार्य: आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार!

December 1, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group