जळगाव, (प्रतिनिधी) : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना कोणताही राजकिय वारसा मिळालेला नव्हता. मुंडे कायम अन्यायाविरूध्द उभे राहिले. राजकारणात लागणारी जिद्द, आत्मविश्वास, संयम त्यांच्यात होता. नवा विचार, नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची त्यांची तयारी होती. उपेक्षित शोषित वर्गामधे त्यांनी नवा विश्वास निर्माण केला. मुंडे हे समाजहितैषी लोकनेते होते, सर्व राजकीय पक्षांना त्यांची आजही उणीव भासते असे असे प्रतिपादन माजीमंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी केले.
दिवंगत केंद्रीय मंत्री तथा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जन्मदिना निमित्त रविवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. रॅलीचे आकर्षण श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय व श्रीराम कन्या प्राथमिक माध्यमिक विद्यालय चे विद्यार्थी लेझीम मध्ये सहभाग घेतला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भागवत भंगाळे, लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, उपाध्यक्ष विजय वंजारी, सचिव प्रवीण सानप, सुनील माळी, राजू मोरे, अशोक लाडवंजारी, अतुल वंजारी, प्रकाश वाघ, किशोर ढाकणे, भानुदास नाईक, योगेश घुगे, कृष्णा पाटील, महादू सोनवणे, संतोष घुगे, सचिन इखे, गजानन चाटे, दिनेश ढाकणे, भूषण लाडवंजारी, रमेश लाडवंजारी, दुर्गेश नाईक, बिजासन घुगे, अनिल घुगे, मिलिंद आंधळे, भैय्या वाघ, हेमंत नाईक, उमेश वाघ, नामदेव वंजारी, विजय लाडवंजारी, स्वप्निल राजेंद्र पाटील, भागवत सानप, शेखर लाड, वैभव सानप, योगेश नाईक, राहुल सानप, तेजस वाघ, रितेश लाडवंजारी, गौरव घुगे, दीपक वाघ, प्रकाश कराड, एकनाथ वाघ, रामेश्वर पाटील, भास्कर लाड, ऋषिकेश वाघ, गिरीश सांगळे, विकी सानप, सचिन चाटे, प्रशांत घुगे, गोरख लाडवंजारी, हरीश सांगळे, मनोज पाटील, संकेत सानप, यश चाटे कार्यक्रमाला उपस्थित होते.
मुंडे साहेबांच्या ७५ व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन रेड क्रॉस सोसायटी जळगाव या ठिकाणी ७५ जणांनी रक्तदान केले. अशी माहिती आजच्या कार्यक्रमाचे समिती प्रमुख माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.