• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाचपट रक्कम करून देण्याचे अमिष दाखवीत व्यापाऱ्याला ४८ लाखात गंडविले

दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 12, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
पाचपट रक्कम करून देण्याचे अमिष दाखवीत व्यापाऱ्याला ४८ लाखात गंडविले

जळगाव (प्रतिनिधी) : येथील एका व्यापाऱ्याला पुतणीच्या पती व दिराने गुंतवणूक करण्याचे आमीष देत तसेच रक्कम पाचपट करून देण्याचे सांगत वेळोवेळी पैसे घेऊन तब्बल ४८ लाख ५६ हजार रुपयांना फसवणूक केली आहे. या फसवणूकप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपाल प्रभूलाल राठी (वय ६३ रा. पिंप्राळा, जळगाव) असे फिर्यादीचे नाव आहे. सन २०१८-१९ मध्ये त्यांनी त्यांची कंपनी विकली होती. त्याचे त्यांना ८८ लाख रुपये मिळाल्याची माहिती त्यांची पुतणी ॲड. वर्षा विजय मंडोरे आणि तिचे पती विजय जगदीश मंडोरे यांना होती. त्यांची पुतणी वर्षा ही धरणात गेलेल्या शेतकऱ्याच्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळवून देण्याचे काम करीत होती. तर वर्षाचे पती विजय मंडोरे व त्यांचे भाऊ लक्ष्मीनारायण मंडोरे हे एलपीजी गॅस किटचा व्यवसाय करीत होते. त्यांनी तो व्यवसाय बंद करून वर्षा मंडोरे हिच्या व्यवसायाला मदत करू लागले होते.

दरम्यान फिर्यादीकडे फॅक्टरी विकल्याचे पैसे आल्याची माहिती असल्याने जावई विजय मंडोरे व त्यांचे भाऊ लक्ष्मीनारायण मंडोरे यांनी फिर्यादी गोपाल राठी यांना पैसे गुंतवणूक करण्याचे सांगितले. गुंतवणूक केलेल्या पैशाच्या रकमेच्या पाच ते सहा पट रक्कम परत देऊ असे आमिष त्यांनी दाखविले. मात्र ही गोष्ट गोपाल राठी यांना पटली नाही. तरीही, आम्ही कुटुंबातील घटक आहोत. आमच्यावर विश्वास नाही का वगैरे बतावणी करत संशयित आरोपी विजय मंडोरे व लक्ष्मीनारायण मंडोरे यांनी फिर्यादी गोपाल राठी यांना गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडले. गोपाल राठी यांनी वेळोवेळी बँक खात्यातून ऑनलाईन तसेच आरटीजीएसद्वारे असे ४८ लाख ५६ हजार रुपये गुंतविले.

मात्र त्यांना मोबदला देण्यात आला नाही. ५० लाख रुपयांची मागणी करून ३ करोड रुपये परत करू अशी बतावणी दोघांनी फिर्यादी गोपाल राठी यांना केली होती. दरम्यान दि. १७ ऑक्टोबर २०१९ ते ११ मे २०२२ दरम्यान संशयित आरोपी विजय जगदीश मंडोरे आणि लक्ष्मीनारायण जगदीश मंडोरे यांनी गोपाल राठी यांच्याकडून ४८ लाख ५६ हजार रुपये घेऊन फसवणूक केली म्हणून त्यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामानंदनगर पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रदीप बोरुडे करीत आहेत.


 

Next Post
बापाने स्वतःची किडनी देऊन वाचवले मुलीचे प्राण !

बापाने स्वतःची किडनी देऊन वाचवले मुलीचे प्राण !

ताज्या बातम्या

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!
खान्देश

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!

December 2, 2025
यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!
खान्देश

यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!

December 2, 2025
अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!
खान्देश

अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!

December 2, 2025
वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!
खान्देश

वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!

December 2, 2025
शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन

December 1, 2025
कामगारांना मतदानासाठी ‘भरपगारी सुट्टी’ अनिवार्य: आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार!
खान्देश

कामगारांना मतदानासाठी ‘भरपगारी सुट्टी’ अनिवार्य: आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार!

December 1, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group