जळगाव, (प्रतिनिधी) : येथील भुसावळ रोड वर असलेल्या दूरदर्शन टावर जवळील श्री स्वामिनारायण मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन दि.१० ते १७ डिसेंबर दरम्यान करण्यात आले असून देश विदेशातील 300 संत या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर कार्यक्रमादरम्यान ११ हजार विद्यार्थी हनुमान चालीसा पठण करून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड करणार असल्याचे पुरुषोत्तम प्रकाश दास शास्त्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
श्री स्वामीनारायण मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित करून माहिती देण्यात आली. यात नयन स्वामी शास्त्री, नंदकुमार भारंबे उपस्थित होते.
स्वामिनारायण मंदिर जळगाव येथील मूर्ती प्राणप्रतिष्ठा तथा मंदिर उद्घाटन सोहळा सकाळी ११.०० वाजेला सुरु होईल. त्यात स्वामिनारायण धून प.पु. आचार्य महाराजश्री यांच्या उपस्थित प.पु. १००८ लालजी श्री सौरभप्रदाजी महाराज यांच्या शुभ हस्ते भगवंताची आरती द्वारा मूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न होईल. या प्रसंगी ३०० स्वामिनारायण संप्रदायाचे संत व जांगाव परिसरातील गादिपती संत व असंख्य संत उपस्तीत राहतील.
परमपूज्य पी.पी. शास्त्री यांनी जळगाव शहरात स्वामीनारायण भगवंतांचे भव्य मंदिर असावे असा संकल्प केला होता. त्यांच्या प्रयत्नाने व गुरुवर्य गोविंद स्वामी यांच्या आशीर्वादाने जळगाव शहरात बांधण्यात आले आहे. सुमारे साडेतीन एकर जमीन क्षेत्रात बांधण्यात आलेल्या बांधकामात ८० हजार घनफूट बन्सी पाड दगडाचा वापर केला आहे. त्यात मुख्य शिखरासह एकूण १९ शीखर असून महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक अद्भुत मंदिराची उभारणी केली.
त्यात १०८ स्तंभ ६० कमानी मुख्य घुमट भगवान विष्णूचे २४ अवतार कलात्मक पद्धतीने हुबेहूब प्रतिकृती प्रत्यक्ष भावदर्शन देतात. त्यात ५७ गणपती मूर्ती वेगवेगळ्या भावमुद्रात कोरलेले आहेत. सदर मंदिरात रामदर विठ्ठल रुक्मिणी, शिव, हनुमान जी, गणेश जी, आणि चारधाम देवांचे दर्शन होणार आहे. तसेच भगवान स्वामीनारायण यांचे लीला चरित्र कथा कोरलेले आहेत. सदर मंदिर परिसरात भव्य हनुमान जी ची मूर्ती ५४ फूट उंचीची सॅनाईट दगडातील मूर्ती आहे.
दि.१० डिसेंबर रोजी स्वातंत्र चौक येथून कालिंका माता मंदिरापर्यंत शोभायात्रा, सायंकाळी महोत्स्तावाचे उद्घाटन केले जाईल. वेदोक्त मंत्रोच्चारात महाविष्णू यज्ञास प्रारंभ करून ग्रंथविमोचन देखील करण्यात येणार आहे.