जळगाव, (प्रतिनिधी) : येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात २६ नोव्हेंबर मंगळवार रोजी घर घर संविधान अभियान अंतर्गत भारतीय राज्यघटनेच्या (संविधान) ७५ व्या अमृत महोत्सवा निमित्त संविधान दिन साजरा करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मार्लापण करून संविधान दिनाबद्दल माहिती दिली. उपशिक्षिका रूपाली आव्हाड यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पाठोपाठ सामूहिक वाचन केले.