जळगाव, (प्रतिनिधी) : गांधी रिसर्च फाउंडेशन चे सहकारी आणि जळगाव जिल्हा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ SWEEP अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेले ऑयकॉन मदन रामनाथ लाठी यांनी जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या म़तदार संघात प्रभावी जनजागृती केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी आयुष प़साद यांनी मदन रामनाथ लाठी आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील ऑयकॉन आणि पत्रकार बंधु यांचा यांचा प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला.
यात प्रामुख्याने वादनगरी ग्राम पंचायती ने १००% मतदान करण्याचा निर्धार आणि तास ठराव केला, ती ग्रामपंचायत राज्यात दुसरी आहे, आवर आणि खेडी खुर्द गावात मतदान जनजागृती केली. त्याबरोबर रोज विविध ठिकाणी मतदानाचे महत्व सांगून शपथ देत आहे. त्यात प्रामुख्याने जैन इरिगेशन सिस्टिम लि, जैन फार्म फ्रेश लि. मधील विविध, ओरिएंट सिमेंट, नशिराबाद, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, मणियार कॉलेज, आयएमआर कॉलेज, के सि इ इंजिनीरिंग कॉलेज, लीग्रँड, सुप्रीम इंडस्ट्रीज यासह इतर ठिकाणी मतदानाबाबत जनजागृती केली. यासाठी मदन लाठींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.