• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राज्यातील समस्यांवर मात करण्यासाठी मविआ विकासाची पंचसूत्री राबवणार.. शरद पवार

मविआची उमेदवारांच्या प्रचारार्थ मुक्ताईनगरात सभा संपन्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 12, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
राज्यातील समस्यांवर मात करण्यासाठी मविआ विकासाची पंचसूत्री राबवणार.. शरद पवार

मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) : विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत प्रचारार्थ जाहिर सभा संपन्न झाली.

या वेळी मार्गदर्शन करताना शरदचंद्र पवार म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत राज्यात महायुतीचे सरकार असूनही त्यांनी जनतेच्या हितासाठी सत्ता वापरली नाही. यामुळे शेतकरी व कष्टकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली, बेरोजगारी वाढली. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी महाविकास आघाडी विकासाची पंचसूत्री योजना राबवणार आहे.

महालक्ष्मी योजनेअंतर्गत स्त्रियांना दरमहा तीन हजार रुपये आणि मोफत बस प्रवास, कृषी समृद्धीसाठी तीन लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांचे अनुदान, हमीभावाचे आश्वासन, बेरोजगार तरुणांसाठी चार हजार रुपये भत्ता, पंचवीस लाखांचा आरोग्य विमा, जातीनिहाय जनगणना आणि ५०% आरक्षण मर्यादा वाढवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा अशा उपाययोजना राबवणार असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदानातून विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या सभेला माजी मंत्री एकनाथराव खडसे साहेब, आ. शिरीष दादा चौधरी, शिवसेना उबाठा संपर्क प्रमुख विजय परब, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते रविंद्रभैय्या पाटील, माजी आ. अरुण पाटील, उदयसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, डॉ. जगदीश पाटील, महाविकास आघाडीचे रावेरचे उमेदवार ॲड. धनंजय चौधरी आणि अन्य महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सभेत उपस्थितांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, मागील निवडणुकीत अल्पमताने पराभव झाला तरी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील जनतेच्या सेवेत सतत कार्यरत राहिले. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन, त्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने केली, निवेदने सादर केली आणि जनसंवाद यात्रा काढून समस्या जाणून घेण्याचा व त्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांना विनंती केली की, याच सेवाभावनेचे बळ देण्यासाठी मतदानरूपी आशीर्वाद द्यावा.
तसेच निवडून आल्यानंतर मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याला प्राधान्य असेल. उपसा सिंचन योजना पूर्णत्वास नेऊन शेतीला पाणी उपलब्ध करून देण्याचा, पर्यटन विकासातून उद्योग आणून तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सक्षमीकरणासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

 


Next Post
व्यापारी वर्गाने डॉ.अनुज पाटील यांना लाडू व पेढा भरवत केले स्वागत

व्यापारी वर्गाने डॉ.अनुज पाटील यांना लाडू व पेढा भरवत केले स्वागत

ताज्या बातम्या

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!
खान्देश

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!

November 8, 2025
जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला
खान्देश

जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला

November 8, 2025
जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम
खान्देश

जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम

November 7, 2025
कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!
खान्देश

कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!

November 7, 2025
१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर
जळगाव जिल्हा

१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर

November 6, 2025
जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे
खान्देश

जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे

November 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group