• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बापाच्या प्रचारासाठी लेकरं सरसावली !

डॉ. प्रियंका आणि सुमित यांनी पालथा घातला मतदारसंघ ; किशोरआप्पा पाटील यांना वाढता प्रतिसाद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 12, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
बापाच्या प्रचारासाठी लेकरं सरसावली !

भडगाव, (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणुकीचा ज्वर वाढत चालला आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघात आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मुलगा सुमित व लेक डाॅ.प्रियंका पाटील यांनी वडिलांसाठी मतदारसंघ पालथा घातला आहे. दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावात प्रचार फेरी पुर्ण केली जात असून त्यांना प्रचारात प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

पाचोरा-भडगाव मतदार संघात राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. सर्वच उमेदवार मतदारसंघ पिंजून काढत आहे. मात्र त्यात आमदार तथा महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांची लेक डाॅ.प्रियंका पाटील व पुत्र सुमित पाटील याने मतदारसंघात घराघरापर्यंत जाऊन वडिलांसाठी आशीर्वाद घेतले आहे.

डाॅ.प्रियंका पाटलांनी पाचोरा तालुका काढला पिंजून..
आमदार किशोर आप्पा पाटील यांची कन्या डाॅ.प्रियंका पाटील यांनी १८ ऑक्टोबर पासून हरेश्वर पिंपळगाव येथून प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर संपुर्ण पाचोरा तालुका २१ दिवसात त्यांनी घरोघर जात पिंजून काढून बापासाठी मत मागीतले. त्यांना मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गावात शेकडोची रॅली निघाल्या. त्यांचे प्रत्येक गावात जंगी स्वागत करण्यात आले. डाॅ.प्रियंका पाटील म्हणाल्या की मला प्रत्येक गावात मिळालेले प्रेमाने भारावून गेल्याचे सांगीतले. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन,जय बारांवकर,जिल्हाप्रमुख विद्यार्थी सेना समवेत सूरज शिंदे,राहुल पाटील, विशाल पाटील, समीर शेख, यश ठाकूर, सागर महाजन तथा संपूर्ण शहर व ग्रामीण शिवसेना, युवासेना पदाधिकारी त्यांचे युवा सेनेचे सर्व सहकारी प्रचारात सहभागी झाले.

लेकाने भडगाव तालुका घातला पालथा..
आमदार किशोरआप्पा पाटील यांचे पुत्र सुमित ने ही १८ ऑक्टोबर पासून भडगाव तालुक्यात प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांचे आशिर्वाद घेतले. त्यांना प्रत्येक गावात प्रचंड प्रतिसाद मिळाला. किशोर आप्पांनी आमच्या गावाचा विकास केला आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या वडिलांसोबत असल्याचे ग्वाही मतदारांनी दिल्याचे सांगीतले. ग्रामिण भागात त्यांचा शंभर टक्के दौरा पुर्ण झाला असून शहरात दोन दिवसापासुन प्रचाराला प्रारंभ केला आहे.

त्याच्यां समवेत पुरुषोत्तम माळी, जिल्हा समन्वयक युवासेना निलेश पाटील, जिल्हासघटक युवासेना नितीन महाजन, उपशहरप्रमुख शिवसेना योगेश सुर्यवंशी, तालुका सरचिटणीस युवासेना अनिल महाजन, समाधान पाटील, जगदीश पाटील, स्वप्निल पाटील, तालुकासंघटक शिवसेना रविंद्र हिम्मत पाटील, राहुल पाटील यांच्यासह युवासेनेच्या पदाधिकार्यानी सहभाग नोंदवला.

लेकरांनी प्रचाराची धुरा घेतली खांद्यावर..
आ. किशोर आप्पा पाटील यांची लेक डाॅ.प्रियंका पाटील व पुत्र सुमित पाटील यांनी या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. तर दुसरीकडे आमदाराच्या पत्नी सुनीता पाटील यांनी पाचोरा शहरात प्रचाराची मोहीम उघडली. डाॅ.प्रियंका पाटील व सुमित पाटील यांना मिळणारा प्रतिसाद हा अभुतपुर्व होता. दोघांनी बापाच्या विजयासाठी स्वत:ला झोकून दिले आहे. आप्पांनी आमच्यापेक्षा मतदारसंघाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. ते पुर्ण मतदारसंघाला कुटुंबच मानता त्यामुळे आपण सर्वांनी किशोर आप्पांच्या पाठीमागे भक्कम पणे उभे राहीले पाहीजे असे अवाहन दोघांनी केले आहे.


Tags: #political
Next Post
पुनश्च विकासाचा झंझावात सुरू करण्याची संधी द्या.. – धनंजय चौधरी

पुनश्च विकासाचा झंझावात सुरू करण्याची संधी द्या.. - धनंजय चौधरी

ताज्या बातम्या

रामराव तायडे यांना ‘राष्ट्रीय कामगार भूषण’ पुरस्कार प्रदान
जळगाव जिल्हा

रामराव तायडे यांना ‘राष्ट्रीय कामगार भूषण’ पुरस्कार प्रदान

July 27, 2025
जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांमध्ये सशस्त्र संघर्ष; एकाचा मृत्यू, एक गंभीर
गुन्हे

जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांमध्ये सशस्त्र संघर्ष; एकाचा मृत्यू, एक गंभीर

July 27, 2025
जळगावात गणेशोत्सवासाठी लगबग: सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची पहिली नियोजन बैठक संपन्न
जळगाव जिल्हा

जळगावात गणेशोत्सवासाठी लगबग: सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची पहिली नियोजन बैठक संपन्न

July 27, 2025
फरारी रोड रॉबरीचा आरोपी अखेर जेरबंद; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
गुन्हे

फरारी रोड रॉबरीचा आरोपी अखेर जेरबंद; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

July 27, 2025
जैन इरिगेशनची दमदार कामगिरी : पहिल्या तिमाहीत उत्पन्न आणि नफ्यात विक्रमी वाढ!
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनची दमदार कामगिरी : पहिल्या तिमाहीत उत्पन्न आणि नफ्यात विक्रमी वाढ!

July 27, 2025
एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशन जळगाव परिमंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर
जळगाव जिल्हा

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशन जळगाव परिमंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर

July 25, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group