पारोळा, (प्रतिनिधी) : येथे भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे पारोळा, एरंडोल, भडगाव विधानसभाचे पदाधिकारींनी प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे व प्रदेश उपाध्यक्ष ॲड.भुषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांची भेट घेऊन अभिनंदन केले. तसेच, आ. आमदार चिमणराव पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी महेश पाटील (जळगाव लोकसभा संयोजक तथा विभागीय उपाध्यक्ष कामगार मोर्चा), ज्ञानेश्वर पुराणिक (विभागीय उपाध्यक्ष, कामगार मोर्चा), डिगंबर पाटील (जिल्हा अध्यक्ष, कामगार मोर्चा), अतुल सोनार (जिल्हा सरचिटणीस, कामगार मोर्चा), विद्याताई पाटील (जिल्हा उपाध्यक्ष, कामगार मोर्चा), योगेश पाटील (जिल्हा सरचिटणीस, कामगार मोर्चा), जितेंद्र निकम (जिल्हा उपाध्यक्ष, कामगार मोर्चा), आनंद सुर्यवंशी (एरंडोल तालुका अध्यक्ष), विद्याधर पाटील (भडगाव तालुका अध्यक्ष), दिपक पाटील (जिल्हा उपाध्यक्ष), पिंटु मावडे (एरंडोल शहराध्यक्ष), नितीन शिनकर (पारोळा शहराध्यक्ष), राहुल पाटील (जिल्हा कोषाध्यक्ष), बबन जाधव (जिल्हा उपाध्यक्ष), कुणाल पाटील, बापु महाजन (एरंडोल शहर चिटणीस) व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.