पारोळा, (प्रतिनिधी) : माझी उमेदवारी विकासकामांचे व्हिजन घेऊन जनतेसमोर जाणारी आहे. मंगळवारी दि. २९ रोजी मी उमेदवारी अर्ज भरणार असून वडील आ. चिमणराव पाटील यांचा जनसेवेचा समृद्ध वारसा पुढे नेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांनी दिली आहे. अमोल पाटील हे जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन असून कृषी उत्पन्न बाजार समितीला गेली १५ वर्षे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
पहा, नेमकं काय म्हणाले, अमोल पाटील..