• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नाकाबंदीत सुमारे २ कोटींची रोकड जप्त

जळगाव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 24, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
नाकाबंदीत सुमारे २ कोटींची रोकड जप्त

जळगाव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातदेखील मंगळवारीपासून नाकाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी एकाच दिवसात १ कोटी ९० लाख ६५ हजार ४१२ रुपयांची रोकड जप्त केली आहे. रोकडबाबत चौकशी सुरु करण्यात आली आहे.

पोलिसांनी चाळीसगाव ग्रामिण पो.स्टे. हददीतील जामडी येथे लावण्यात आलेल्या एसएसटी पॉइंटवर दुपारी १ वाजेच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान नागदकडुन चाळीसगावकडे जात असलेल्या महिंद्रा वाहनाची तपासणी केली. या वाहनामध्ये ७ लाख २२ हजार ५०० रोख रक्कम मिळून आली. पोलिसांनी रक्कम जप्त केली असून कोषागारात जमा केली आहे.

कासोदा पोलीस स्टेशन हददीतील फरकांडे फाट्याजवळ ऑल आउट स्किम नाकाबंदी करीत असताना एरंडोलकडून येणारी पांढऱ्या रंगाची क्रेटा ही सांयकाळी ५.४५ वाजेच्या दरम्यान थांबवून तपासणी केली असता ५०० व १०० दराच्या नोटा मिळून आल्या. पोलिसांनी रक्कम तपासली असता १ कोटी ४५ लाख रुपये असल्याचे समजते. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

भडगाव पोलीस स्टेशन हददीतील पारोळा चौफुली भडगाव येथे नाकाबंदी दरम्यान वाहनाची तपासणी करताना १ लाख ४९ हजार रुपये रोख मिळुन आली असून सदर रक्कम पुढील कारवाईसाठी पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघातील एफएसटी पथक क्र.३ यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. जामनेर पोलीस स्टेशन हदीतील नेरी येथे नाकाबंदी दरम्यान एक इसमाच्या ताब्यातुन ४ लाख ४६ हजार १२० रुपये मिळून आल्याने ते जप्त करण्यात आलेले आहेत. पोलिसांनी प्रशासनाच्या सहकार्याने एकाच दिवसात १ कोटी ९० लाख ६५ हजार ४१२ रुपयांची रोकड जप्त केली आहे.

Tags: Crime
Next Post
आमदार राजूमामा भोळे सोमवारी दाखल करणार अर्ज

आमदार राजूमामा भोळे सोमवारी दाखल करणार अर्ज

ताज्या बातम्या

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add