• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्तन कर्करोग जनजागृतीविषयी ‘जीएमसी’त पथनाट्य सादर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 22, 2024
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
स्तन कर्करोग जनजागृतीविषयी ‘जीएमसी’त पथनाट्य सादर

जळगाव, (प्रतिनिधी) : स्तन कर्करोग ही महिलांमध्ये आढळणारी सर्वात सामान्य प्रकारची कर्करोगाची समस्या आहे. त्याचा सुरुवातीला निदान झाल्यास उपचार सोपे होऊ शकतात. म्हणून स्तन कर्करोगाची लक्षणे ओळखणे आणि नियमित तपासण्या करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शल्यचिकित्सा विभागातर्फे स्तन कर्करोग जनजागृती महिन्यानिमित्त विशेष उपक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. त्यातून उपस्थित रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, शल्यचिकित्सा विभाग प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, उप अधिष्ठाता डॉ. रमेश वासनिक, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. विश्वनाथ पुजारी उपस्थित होते. सुरुवातीला कार्यक्रमाचे नोडल अधिकारी सहयोगी प्रा. डॉ. संगीता गावित यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती सांगितली. यानंतर शल्यचिकित्सा विभागाच्या निवासी विद्यार्थ्यांनी स्तन कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी एक नाटिका सादर केली.

नाटिकेतून स्तन कर्करोगविषयी संदेश देण्यात आला. स्तन कर्करोगाची मुख्य लक्षणे हि स्तनात गाठ निर्माण होणे, त्वचेचा रंग बदलणे, स्तनात वेदना किंवा अस्वस्थता, स्तनातून स्त्राव येणे असे आहेत. विभागाच्या मदतीने ओपीडी क्रमांक ११६ येथे सर्व तपासण्या मोफत केल्या जात आहेत आणि तपासणीसाठी सर्वतोपरी मार्गदर्शन उपलब्ध आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे. सूत्रसंचालन डॉ. सुनील गुट्टे यांनी केले. आभार डॉ. शर्वरी कदम यांनी मानले. कार्यक्रमासाठी विभागातील प्राध्यापकांसह डॉ. ज्ञानेश्वर पवार, डॉ. अभिषेक उंबरे आदी विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.

Tags: #medical
Next Post
पाच वर्षापासुन चोरीला गेलेल्या मोटरसायकलचे दोन गुन्हे उघडकिस

पाच वर्षापासुन चोरीला गेलेल्या मोटरसायकलचे दोन गुन्हे उघडकिस

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add