• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अजितदादांचा दाखवण्यापेक्षा अॅक्शनवर विश्वास, म्हणूनच मी त्यांच्या पाठीशी उभं राहणं पसंत केलं.. – सयाजी शिंदे

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 11, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
अजितदादांचा दाखवण्यापेक्षा अॅक्शनवर विश्वास, म्हणूनच मी त्यांच्या पाठीशी उभं राहणं पसंत केलं.. – सयाजी शिंदे

मुंबई, (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला असून, प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांचे पक्षात स्वागत केले.

▪️आजचा रंग- जांभळा 

सयाजी शिंदे यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत समाजातील उपेक्षित घटकांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली. शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या प्रबळ मराठा समाजातील शिंदे यांच्याकडे स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा आधार असून त्यांच्या ‘सह्याद्री देवराई’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ते राज्याच्या ग्रामीण भागात सक्रीय पणे कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे यांच्या प्रवेशाचा उद्देश ग्रामीण मतदार तसेच विचारवंत वर्गात पक्षाचा पाया मजबूत करणे हा आहे, कारण ते विचारवंत वर्तुळात चांगलेच लोकप्रिय आहेत. अजित पवार यांनी सयाजी शिंदे हे पक्षाचे स्टार प्रचारक बनून राज्यभर प्रचार करणार असल्याचे जाहीर केले.

अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांचे पक्षात स्वागत करताना सयाजी शिंदे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. शिंदे यांनी विशेषत: वृक्षलागवड, पाणी व मृदसंधारण क्षेत्रात घेतलेल्या उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला. ते केवळ अभिनेते नाहीत, तर सच्चे समाजसेवक आहेत, याची साक्ष त्यांचे सामाजिक कार्य आहे. सयाजींची विचारधारा आणि त्यांचे प्रयत्न आमच्या पक्षाच्या मूळ तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहेत, जे समाजाच्या प्रत्येक स्तराच्या उन्नतीसाठी समर्पित आहे, असे अजित पवार म्हणाले. सयाजी शिंदे यांच्या प्रवेशामुळे पक्षाची धोरणे व कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल, असे राष्ट्रवादी चे अध्यक्ष म्हणाले.

राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत बोलताना सयाजी शिंदे यांनी अजितदादांशी असलेल्या आपल्या जुन्या नात्यावर भर दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना ते म्हणाले की, “त्यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे ते आपल्या शब्दावर ठाम आहेत.ते आतून जसे आहे, तसेच बाहेरही आहे. आणि स्वभावाने मीही तसाच आहे. माझ्या मनात जे काही आहे, ते मी स्पष्टपणे बोलतो, हे तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. अजितदादा आणि माझ्यात हे काहीतरी साम्य आहे. सयाजी शिंदे आपल्या ‘सह्याद्री देवराई’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. राजकारणात येऊन आपण समाजसेवा पुढे नेऊ शकतो आणि समाजासाठी अधिक योगदान देऊ शकतो, असे ते म्हणाले. त्यांच्यासाठी अजित पवारांपेक्षा चांगला पर्याय नाही, कारण त्यांचा पक्ष उपेक्षितांसाठी काम करतो – शेतकरी, महिला, मजूर. राष्ट्रवादीची विचारधारा शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या शिकवणुकीवर आधारित आहे, जी मला मनापासून भावते, असे शिंदे म्हणाले. सर्व पक्षांपैकी आपण राष्ट्रवादीची निवड का केली, या प्रश्नावर अभिनेता सयाजी शिंदे म्हणाले की, “इतर पक्षात जाण्यासाठी बरेच पर्याय होते, परंतु मी केवळ अशा पक्षात जाण्याचा विचार केला जिथे नेतृत्व पारदर्शक असेल आणि खऱ्या अर्थाने समाजाच्या कल्याणासाठी काम करेल”. अजित पवार यांची दूरदृष्टी आणि नेतृत्व वेगळे असून माझ्याप्रमाणेच त्यांचाही दाखवण्यापेक्षा कृतीवर विश्वास आहे, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.


 

Tags: #political
Next Post
कालिका माता मंदिर येथे आ. राजूमामा, माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते महाआरती

कालिका माता मंदिर येथे आ. राजूमामा, माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते महाआरती

ताज्या बातम्या

‘बहिणाबाई महोत्सवा’त फॅशन शोच्या माध्यमातून परंपरा आणि आधुनिकतेचे दर्शन
खान्देश

‘बहिणाबाई महोत्सवा’त फॅशन शोच्या माध्यमातून परंपरा आणि आधुनिकतेचे दर्शन

January 25, 2026
तेली समाज महिलांचा स्नेहमेळावा: हळदी-कुंकू आणि खेळांची रंगली मैफल
खान्देश

तेली समाज महिलांचा स्नेहमेळावा: हळदी-कुंकू आणि खेळांची रंगली मैफल

January 24, 2026
माय-लेकीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले; संशयिताला बेड्या
गुन्हे

माय-लेकीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले; संशयिताला बेड्या

January 24, 2026
खान्देशी संस्कृतीचा जागर; जळगावात ‘बहिणाबाई महोत्सवा’चा दिमाखात शुभारंभ
खान्देश

खान्देशी संस्कृतीचा जागर; जळगावात ‘बहिणाबाई महोत्सवा’चा दिमाखात शुभारंभ

January 23, 2026
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हॉकर्स बांधवांतर्फे पुष्पहार अर्पण
जळगाव जिल्हा

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हॉकर्स बांधवांतर्फे पुष्पहार अर्पण

January 23, 2026
गर्जना पत्रकार संघाची जळगावात बैठक; उत्तर महाराष्ट्रसह जिल्हा कार्यकारिणीची होणार निवड
खान्देश

गर्जना पत्रकार संघाची जळगावात बैठक; उत्तर महाराष्ट्रसह जिल्हा कार्यकारिणीची होणार निवड

January 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group