जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये व्यापाऱ्याच्या पत्नीचा डोक्यात हातोड्याने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि.१० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघड झाली होती. दरम्यान, उसनवारीने दिलेले पैसे संशयित आरोपींकडे मयत महिलेने वारंवार मागून तगादा लावला म्हणून एका महिलेसह तिघांनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशन आणि एलसीबीचे पथक यांनी २० तासात याचा उलगडा करून तिघांना ताब्यात घेतले आहे.
▪️आजचा रंग- जांभळा
सुवर्णा राजेश नवाल (वय ५७, रा. रणछोड नगर, गणेश वाडी जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती राजेश नवाल हे दाणा बाजार परिसरामध्ये धान्याचे व्यापारी आहेत. (केपी)दरम्यान गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या पूर्वी सुवर्णा नवाल ह्या घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला असल्याचे निष्पन्न झाले होते. पती राजेश नवाल हे घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) निरीक्षक बबन आव्हाड आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरु केला.
एलसीबीने मयत सुवर्णा नवाल यांचे मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स तपासले. त्यात एका नंबरवर दिवसात सारखे ४ ते ५ वेळा फोन आल्याचे दिसले. त्या दृष्टीने तपासले असता पोलीस संशयित आरोपी लालबाबू उर्फ लाला रामनाथ पासवान (वय ४३, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांच्यापर्यंत पोहोचले.(केपी)तसेच, तपासानुसार आणखी दोघे सरलाबाई धर्मेंद्र चव्हाण (वय ४२, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव), राजेंद्र उर्फ आप्पा रामनाथ पाटील (वय ५८, रा. म्हसावद ता. जळगाव) यांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर तिघांना पोलिसी खाक्या दाखविताच तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
दि.१० रोजी सुवर्णा यांनी दिवसभरात लाला याला फोन करून उसनवारीने दिलेले पैसे परत मागितले. सततच्या तगाद्याला कंटाळून अखेर लाला पासवान, सरलाबाई आणि राजेंद्र यांनी काल गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता रणछोड नगरातील सुवर्णा नवाल यांचे घर गाठले. तेथे पैसे परत मागण्यावरून महिलेशी तिघांचे वाद झाले.(केपी)त्यातून लाला पासवान याने सुवर्णा यांच्या डोक्यात हातोड्याचे २ जबर वार करून त्यांना संपविले. तेथून तिघे पसार झाले. दरम्यान, पोलिसांनी “कॉल डिटेल्स” काढून तिघांचा माग काढत त्यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यातील हातोडा देखील जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी हि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) निरीक्षक बबन आव्हाड (केपी)आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीएसआय दत्तात्रय पोटे, अतुल वंजारी, विजयसिंग पाटील, राजेश मेंढे, संजय हिवरकर, एमआयडीसीचे पीएसआय दीपक जगदाळे, पीएसआय शरद बागल, सिद्धेश्वर डापकर, नितीन ठाकूर, चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, गणेश ठाकरे, रामहरी गीते अर्चना गायकवाड आदींनी केली आहे.