जळगाव, (प्रतिनिधी) : पारोळा पोलिस स्टेशन हद्दीतील स्थानबध्द इसम सुनिल ऊर्फ सल्ल्या लक्ष्मण पाटील (वय २९ रा. अमळनेर रोड, पारोळा) याच्या विरुध्द भादंवि कायद्या अंतर्गत ११ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले. सुनील पाटील याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
“धोकादायक व्यक्ती” या संज्ञेत पारोळा पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी सदरचा प्रस्ताव तयार करून स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथे सादर केला. सदर प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी यांचे कडेस सादर करण्यात आला होता.(केपी) त्यानुसार दि.२७ रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशअन्वये नागपूर जि. नागपूर या कारागृहात स्थानबध्द करण्याबाबत आदेश पारीत केला आहे.
त्यानुसार पारोळा पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक सुनिल पवार, पोउनि.राजु जाधव, पोहेकों/प्रविण पारधी, सुनिल हटकर, पोकों/आशिष गायकवाड, विजय पाटील, महेंद्र पाटील अशांनी स्थानबध्द इसमास दि.०४ रोजी ताब्यात घेतले आहे. त्याला मध्यवर्ती कारागृह, नागपूर जि. नागपूर येथे दाखल केले आहेत.