• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आमदार राजूमामा भोळे चषक अंतर्गत राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात

अंतिम सामन्यात रिगन अल्बुकर्क, संपदा भिवंडकर विजयी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 1, 2024
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
आमदार राजूमामा भोळे चषक अंतर्गत राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील जळगाव जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे आमदार राजूमामा भोळे चषक अंतर्गत ४ थी राज्य अजिंक्यपद (मानांकन) टेबल टेनिस स्पर्धा २०२४ चे आयोजन शहरातील एकलव्य क्रीडा संकुल येथे दि. ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. मंगळवारी दि. १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी १९ वर्षाखालील खेळाडूंचे सामने संपले. यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.

मंगळवारी १९ वर्षाखालील खेळाडूंच्या स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी मंचावर सामाजिक कार्यकर्ते विशाल भोळे, माजी नगरसेवक नितीन बरडे, प्रदीप तळवलकर, टेबल टेनिस असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश चौबे, चंद्रशेखर त्रिपाठी, सचिव विवेक अळवणी, खजिनदार संजय शहा, सदस्य प्रा. चारुदत्त गोखले, राजू खेडकर, डॉ. श्रीधर त्रिपाठी, सुनील महाजन उपस्थित होते.

स्पर्धेत मुलींच्या गटात संपदा भिवंडकर हिने अंतिम सामन्यात काव्य भट्ट हिला पराभूत करून विजेतेपद पटकावले. तर मुलांच्या गटात अंतिम सामन्यात जश मोदीचा रिगन अल्बुकर्क याने चुरशीच्या सामन्यात पराभव केला. मान्यवरांनी खेळाडूंचे कौतुक करून त्यांना आमदार चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेला आ. राजूमामा भोळे व टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सदिच्छा देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. प्रास्ताविक अड. विक्रम केसकर यांनी केले. सूत्रसंचालन करून आभार राजेश जाधव यांनी मानले.

Next Post
महाराष्ट्रासाठी भरीव निधी आणण्याची आमची क्षमता.. -अजित पवार

महाराष्ट्रासाठी भरीव निधी आणण्याची आमची क्षमता.. -अजित पवार

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group