• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शाळेतील शिपायाकडूनच मागितली मुख्याध्यापकाने दहा हजारांची लाच

पारोळा शहरातील घटना, धुळे एसीबीची कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 26, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
शाळेतील शिपायाकडूनच मागितली मुख्याध्यापकाने दहा हजारांची लाच

जळगाव, (प्रतिनिधी) : शैक्षणिक संस्थेत नोकरी टिकवायची असेल तर प्रत्येक शिपाईला १० हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा नोकरीकाळात त्रास होईल अशी धमकी देऊन लाच मागणाऱ्या मुख्याध्यापकाविरुद्ध धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याचा प्रकार समोर आलायं.

तकारदार हे नागरी एज्युकेशन सोसायटी गर्ल्स हायस्कुल, पारोळा येथे सन २०११ पासुन शिपाई या पदावर कार्यरत आहे. संस्थेचे चेअरमन मिलींद मिसर यांचे भाऊ गौतम मिसर हे संस्थेच्या बॉईज हायस्कुलमध्ये मुख्याध्यापक पदावर आहेत. (केपी) गौतम मिसर यांनी सदर संस्थेत कार्यरत असलेल्या तक्रारदार यांचेसह सर्व शिपायांना त्यांच्याकडे बोलावुन घेतले. त्या सर्वांना संस्थेच्या चेअरमन पदावर त्यांचे भाऊ मिलींद मिसर यांची नियुक्ती झाली असुन या संस्थेत नोकऱ्या टिकवायच्या असतील तर प्रत्येक शिपायास प्रत्येकी १०,०००/- रूपये जमा करावे लागतील अन्यथा तुम्हाला नोकरीत त्रास होईल असे सांगीतले होते.

मुख्याध्यापक गौतम मिसर यांच्या मागणीप्रमाणे तकारदार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयाकडे दि.०९ फेब्रुवारी २०२४ रोजी तकार केली होती. सदर तकारीची पडताळणी दरम्यान संशयित आरोपी मुख्याध्यापक मिसर यांनी तक्रारदार यांचेकडे १० हजार रुपये लाचेची मागणी करुन शाळेतील उप शिक्षक सचिन पाटील यांच्याकडे देण्यास सांगीतले. तसेच दि.१२ फेब्रुवारी रोजी सापळा कारवाई आयोजीत केली असता सदर कार्यवाही दरम्यान मुख्याध्यापक गौतम मिसर यांनी सदर लाचेची रक्कम शाळेतील उप शिक्षक धर्मेंद्र शिरोडे यांच्याकडे देण्यास सांगीतले. परंतु तकारदार यांना मुख्याध्यापक गौतम मिसर यांच्या सांगण्याप्रमाणे इतरांकडे लाचेची रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने सदरची कार्यवाही स्थगीत करण्यात आली होती.

मुख्याध्यापक गौतम मिसर यांनी तकारदार यांच्याकडे दि.१० व दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी १० हजार रूपये लाचेची मागणी केली म्हणुन त्यांचे विरुध्द पारोळा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेडडी व वाचक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपुत यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.


Tags: Crime
Next Post
समाजाची भरकटलेली दिशा बदलविण्याची ताकद महिलांमध्ये.. – जयश्री पोफळे

समाजाची भरकटलेली दिशा बदलविण्याची ताकद महिलांमध्ये.. - जयश्री पोफळे

ताज्या बातम्या

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!
खान्देश

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!

November 8, 2025
जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला
खान्देश

जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला

November 8, 2025
जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम
खान्देश

जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम

November 7, 2025
कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!
खान्देश

कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!

November 7, 2025
१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर
जळगाव जिल्हा

१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर

November 6, 2025
जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे
खान्देश

जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे

November 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group