• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विवाहितेचा प्रेमसंबंधात निर्घृण खून, संशयिताला अटक

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील घटना,

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 26, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
विवाहितेचा प्रेमसंबंधात निर्घृण खून, संशयिताला अटक

जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे प्रेम संबंधातून झालेल्या भांडणात बुधवारी रात्री साडेअकरा वाजता तरुणाने विवाहितेवर चाकूचे वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना ग्रामस्थांच्या समोर घडली. या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून एक व्यक्ती जखमी झाला आहे.

सोनाली महेंद्र कोळी (वय २८ रा. साकेगाव ता. भुसावळ) असे मयत विवाहितेचे नाव आहे. गावात ती पती व लहान मुलांसह राहत होती. गावातीलच सागर रमेश कोळी (वय २८) याच्यासह तिचे प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधमधून त्यांच्यामध्ये नेहमी भांडण होत असे.(केपी) बुधवारी दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गावात सागर रमेश कोळी याने सोनाली महिंद्र कोळी हिच्याशी पुन्हा भांडण उकरून काढले. या भांडणामधून सागर कोळी याने सोनाली कोळी हिच्या पाठीवर, पोटाच्या बाजूला, उजव्या हाताला, चाकूने भोसकून जबर दुखापत केली. त्याला अडवण्यासाठी फिर्यादी विनोद सुभाष कुंभार (वय २८ वर्ष) हे धावले असता सागरच्या हातातील चाकू विनोद यांच्या उजव्या हाताच्या बोटाला लागून दुखापत झाली.

सागर कोळी तेथून गेल्यावर जखमी सोनाली कोळी हिला रक्तस्त्राव होत असल्यामुळे गावातील आनंद ठाकरे यांनी भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी सोनालीला तपासून मयत घोषित केले. या घटनेमुळे साकेगावात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत विनोद सुभाष कुंभार (वय २८ वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव हे करीत आहेत.

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
शाळेतील शिपायाकडूनच मागितली मुख्याध्यापकाने दहा हजारांची लाच

शाळेतील शिपायाकडूनच मागितली मुख्याध्यापकाने दहा हजारांची लाच

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group