जळगाव, (प्रतिनिधी ) : समतानगरातील घर जळालेल्या कुटुंबियांना जैन उद्योग समुहा कडून मदत करण्यात आली आहे. जळगाव शहरातील समतानगरातील धामणगाव वाडा येथील घराला शार्टसकीटमुळे आग लागल्याने संसार उपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या होत्या.
दुर्गाबाई सदाशिव चव्हाण, किशोर सदाशिव चव्हाण, सावित्री किशोर चव्हाण, समीक्षा किशोर चव्हाण, रितिका किशोर चव्हाण या पीडित कुटुंबियाना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याशी मदतीबाबत चर्चा केली होती.
त्यानुसार जैन उद्योग समुह कडून संसार उपयोगी वस्तू पीडित कुटूंबीयांना देण्यात आल्या. यावेळी जैन उद्योग समुहाचे अनिल जोशी, प्रताप बनसोडे, किरण अडकमोल, अनिल लोढे, गौतम सरदार, लताबाई कोळी, अंजनाबाई पाटील, जनाबाई चौधरी आदी उपस्थित होते.