• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वैद्यकीय-अभियांत्रिकीत करियर करणाऱ्या विद्यार्थ्यांना आकाश क्लासेस देणार मदतीचा हात..!

सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना मिळणार रोख पुरस्कारासह परदेश वारी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 10, 2024
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
वैद्यकीय-अभियांत्रिकीत करियर करणाऱ्या विद्यार्थ्यांना आकाश क्लासेस देणार मदतीचा हात..!

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडतर्फे (आकाश क्लासेस) राष्ट्रीय पातळीवरील अँथे शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत असून, यामधून वैद्यकीय-अभियांत्रिकीत करिअर करू इच्छिणाऱ्या मुलांना मदतीचा हात दिला जाणार आहे अशी माहिती आकाश क्लासेसचे शाखा व्यवस्थापक पुंडरिक भारद्वाज यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना भारद्वाज म्हणाले की, सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येईल. पाच विद्यार्थ्यांना अमेरिकेतील केनेडी स्पेस सेंटरमध्ये मोफत सहल, १५० सर्वोत्कृष्ट ५० विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार आणि अन्य लाभ दिले जाणार आहेत. दि.१९ ते २७ ऑक्टोबर दरम्यान ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहे. शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती उपलब्ध असणार आहे. गतवर्ष देशभरातून ११.८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परीक्षेची नोंदणी विद्यार्थी किंवा पालकाना anthe.aakash.ac.in या ऑनलाइन किंवा आकाशच्या केंद्रात अर्ज करता येईल. आकाश कडून १५ वर्षांपासून ही परीक्षा घेतली जात आहे. ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आकाशच्या विस्तृत कोचिंग प्रोग्रामचा फायदा झाला होतो.

याद्वारे विद्यार्थ्यांना नीट, जेईई, राज्य सीईटी सह एनटीएसई, ऑलिम्पियाड सारख्या विविध परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते.परिणामी असंख्य विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि क्षमतां मधील अंतर भरुन काढण्यात अँथे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. डॉक्टर, अभियंते घडवण्यासाठी आणि डॉ. अब्दुल कलाम, स्वामीनाथन आदींसारख्या प्रतिभांचा शोध घेण्यासाठीही परीक्षा असून, त्यातून आपली तरुणाई विज्ञान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अग्रगण्य कार्य करत भारताचा जगात गौरव करतील, अशी अपेक्षा आकाश क्लासेसची आहे. तसेच भारतातील २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही परीक्षा होणार आहे. उत्कृष्ट विद्यार्थ्यांना १०० टक्क्यांपर्यंतच्या शिष्यवृत्ती व्यतिरिक्त रोख पुरस्कार देखील मिळतील असे मत भारद्वाज यांनी बोलताना सांगितले.पत्रकार परिषदेला प्रीतम कुमार,राहुल कुमार ,अमित प्रताप सिंग आदींची उपस्थिती होती.

९० गुणांची परीक्षा..
आकाश संस्थेच्या देशभरातील ३९५ हून अधिक केंद्रांवर २० आणि २७ ऑक्टोबर रोजी सकाळी१०.३० ते ११.३० या वेळेत ऑफलाइ नतर ऑनलाइन परीक्षा १९ ते २७ ऑक्टोबर२०२४ ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ही एक तासाची चाचणी असेल. ज्यामध्ये एकूण ९० गुण असतील. विद्यार्थ्यांच्या ग्रेड,कलवर आधारित ४० एमसीक्यू पद्धतीचे प्रश्न असतील. परीक्षेसाठी नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख ऑनलाइन परीक्षा सुरू होण्याच्या तीन दिवस आधी आणि ऑफलाइन परीक्षेच्या सात दिवस आधी आहे. ऑफलाइन आणि ऑनलाइन परीक्षेसाठी २०० रुपये परीक्षा शुल्क आहे.१५ ऑगस्ट पूव नोंदणी केल्यास नोंदणी शुल्कात ५० टक्के सवलत मिळेल.

व्हिडिओ पाहिला विसरू नका..


 

Next Post
म्हसावद येथे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास शासनाची मंजुरी !

म्हसावद येथे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास शासनाची मंजुरी !

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add