बारामती, (वृत्तसंस्था ) : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ९० ते १०० जागांवर लढण्याची तयारी सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार गट ९० ते १०० जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्राथमिक स्तरावर तयारी असावी म्हणून १०० च्या जवळपास जागांसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मीटिंगद्वारे यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत.
पक्षाचा अहवाल लवकरात लवकर गोळा करा आणि बूथ कमिट्या तयार करा, अशा सूचना वरिष्ठ नेत्यांनी निरीक्षकांना दिल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाने नेमलेल्या निरीक्षकांची झूम मीटिंग झाली होती. यामध्ये यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. गणपती उत्सवांनंतर पक्षाला अहवाल दिला जाणार असल्याची माहिती आहे.