• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दोन चिमुकल्या भावांचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 7, 2024
in गुन्हे, राज्य, राष्ट्रीय
0
दोन चिमुकल्या भावांचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

गोंदिया (वृत्तसंस्था ) : राज्यासह देशात गणेशोत्सवाची धूम सुरु असतांना गोंदिया जिल्ह्यातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील पोंगेझरा हिरडामाली येथे घरा शेजारून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावर खेळत असताना दोन सख्या चिमुकल्या भावांचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी घडली. रुद्र सुजित दुबे (वय ३ वर्ष ) आणि शिवम सुजित दुबे (वय २ वर्ष) दोन्ही राहणार पोंगेझरा हिरडामाली अशी दोन्ही मृतकांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली येथील पोंगेझरा देवस्थानाच्या बाजूला एक नाला वाहतो. त्या नाल्यावर पूल बांधण्यात आला असून पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात नेहमीच या पुलावरून पाणी वाहत असते. दरम्यान, देवस्थानात राहणारे पुजारी सुजित दुबे यांचे दोघे रुद्र सुजित दुबे आणि शिवम सुजित दुबे चिमुकले काल सायंकाळी खेळता खेळता या पुलावर पोहोचले अन् दुर्दैवी घटना घडली.

सदर घटनेसंदर्भात गोरेगाव पोलिसात वडील सुजित दुबे यांनी हरविल्याची तक्रार दाखल केली होती. घटना घडल्यानंतर बऱ्याच ठिकाणी शोधाशोध केल्यानंतरही दोघे चिमुकले सापडले नाही. मात्र, आज पुन्हा शोधकार्य सुरू असताना दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह पोंगेझरा हिरडामालीच्या जवळ असलेल्या नाल्यात तरंगताना आढळले. घटनेची नोंद गोरेगाव पोलीसात करण्यात आली आहे. या घटनेने मात्र दुबे कुटुंबियांसह परिसरात शोककळा पसरली आहे.

Tags: Crimegondia
Next Post
मणिपूरमध्ये हिंसाचारात ५ जणांचा मृत्यू

मणिपूरमध्ये हिंसाचारात ५ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 9, 2026
जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी
शैक्षणिक

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी

August 9, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
आरोग्य

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 7, 2026
१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार
जळगाव जिल्हा

१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

August 7, 2026
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
आरोग्य

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add