• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

देशाच्या भविष्याला आकार देण्याचे काम करणाऱ्यात शिक्षकांचा वाटा मोठा.. – मंत्री गिरीश महाजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 6, 2024
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
देशाच्या भविष्याला आकार देण्याचे काम करणाऱ्यात शिक्षकांचा वाटा मोठा.. – मंत्री गिरीश महाजन

जळगाव, दि.०६ : कुंभार जसा मातीला आकार देऊन त्यापासून वेगवेगळ्या मौल्यवान वस्तू तयार करतो, त्याचप्रमाणे शिक्षक देखील विद्यार्थ्यांना आकार देऊन त्यांच्या माध्यमातून देशाचे उद्याचे भवितव्य निर्माण करीत असतात. त्यामुळेच देशाच्या विकासात शिक्षकांचा वाटा मोठा आहे असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. शहरातील गंधे सभागृहात ५ सप्टेंबर रोजी आयोजित जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खा. स्मिता वाघ, आ. लता सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुंबई येथे असल्याने त्यांनी या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणाली द्वारे संवाद साधला.

यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे काम या जिल्ह्यातील शिक्षक करीत आहेत. शिक्षकांच्या माध्यमातून उद्याची पिढी घडत असते शिक्षक वेगवेगळे विद्यार्थी तयार करण्याचे काम करतात. त्यातूनच अनेक मोठ्या पदावरील अधिकारी, राजकारणी, कलावंत तसेच विविध क्षेत्रात काम करणारे नागरिक घडत असतात. कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देतो त्याप्रमाणे शिक्षक देखील विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देत असतात. आदर्श शिक्षक पुरस्कार वाटपात आता पूर्णपणे पारदर्शकता आलेली असून हे पुरस्कार प्राप्त करून घेण्यासाठी देखील आता गुणवत्तेची गरज आहे. असे प्रतिपादन देखील गिरीश महाजन यांनी केले.

दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित शिक्षकांची संवाद साधताना पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील म्हणाले की, शिक्षक हा समाजाचा आत्मा असून प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाचे महत्व मोठे आहे. जळगाव जिल्हा हा शैक्षणिक गुणवत्तेत कुठेही कमी राहिलेला नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा मोठ्या प्रमाणावर उंचावलेला आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे काम देखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेलो नसलो तरी सर्व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे मी अभिनंदन करतो तसेही त्यांनी यावेळी सांगितले.

या शिक्षकांचा झाला सन्मान..
ज्ञानेश्वर भाईदास कुवर, जि प प्राथमीक शाळा जळोद, जितेंद्र प्रल्हाद पाटील, जि प प्राथमीक शाळा भडगाव, अजय रमेश वाघोदे, जि प प्राथमीक शाळा हरणखेडा, संदीप कडू पाटील, जि प प्राथमीक शाळा निंबोरा, संजय धुडकू मोरे दीप प्राथमिक शाळा उपखेड, प्रवीण शांताराम माळी जि प प्राथमीक शाळा अजातिशीम, दिलीप जुलाल कुंभार जि प प्राथमीक शाळा भोणे, हरचंद राघो महाजन जि प प्राथमीक शाळा सावदे, किरण मुरलीधर सपकाळे जि प प्राथमीक शाळा सावखेडा, संदीप मधुकर सोनार जि प प्राथमीक शाळा टाकळी, सुनील रामदास आढागळे जि प प्राथमीक शाळा मुक्ताईनगर, पुष्पालाचा आनंदराव पाटील जि प प्राथमीक शाळा कृष्णराव नगर, संजय संतोष पाटील जि प प्राथमीक शाळा सर्वे, जितेंद्र दिगंबर पाटील जि प प्राथमीक शाळा मोरगाव, दीपक वसंतराव चव्हाण जि प प्राथमीक शाळा शिरसाळा या शिक्षकांना यावेळी सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र देऊन आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.


Next Post
विजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group