जळगाव (प्रतिनिधी ) : माइक्रोव्हिजन स्कूल, रावेर येथील हिंदी विभाग-प्रमुख डॉ.प्रदीपकुमार सुरेश कळसकर यांनी हिंदी क्षेत्रात गेली १६ वर्ष केलेले योगदान, त्यांची सेवा लक्षात घेता १ सप्टेंबर रोजी ठाणे-मुंबई येथे “नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम” द्वारा, मान्यवरांच्या हस्ते “आदर्श शिक्षक पुरस्कार- २०२४” देवून गौरविण्यात आले. चंद्राई बिग बिलिनियर मल्टीपर्पज फाउंडेशन इंडिया च्या माध्यमातून भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या ५ सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधत राज्यस्तरीय आदर्श गुरुजन पुरस्कार- २०२४ देण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुनील भास्कर पाटील (स.आयुक्त स्काऊट गाईड ), राजेंद्र जयसिंग राजपूत ( संचालक एसएससी बोर्ड, मुंबई), संस्थेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील, जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील, मुख्याध्यापक जनार्दन धनगर, उप-मुख्याध्यापक दिपक महाजन, व्यवस्थापक किरण दुबे व संचालक मंडळ तसेच शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.