• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चार वर्षांच्या मुलीवर तीन अल्पवयीन मुलांकडून अत्याचार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 4, 2024
in गुन्हे, महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
चार वर्षांच्या मुलीवर तीन अल्पवयीन मुलांकडून अत्याचार

वाचा कुठे घडली घटना ….

डेहराडून (वृत्तसंस्था ) : उत्तराखंडमधील सितारगंजमध्ये चार वर्षांच्या मुलीवर तीन अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केला. तिन्ही आरोपी अल्पवयीन असून ते मुलींच्या शाळेत शिकतात. यातील एक आरोपी विशिष्ट समाजातील असल्याने पोलिस-प्रशासन खबरदारी घेत आहे. गोंधळाची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तिन्ही आरोपी ९, ११ आणि १४ वर्षांचे आहेत. १४ वर्षीय आरोपी एका विशिष्ट समाजातील असून सध्या फरार आहे. अन्य दोन आरोपींना पोलिस संरक्षणात ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी एका महिलेने आपली ४ वर्षांची मुलगी शाळेत गेल्याची माहिती पोलिसांना दिली. जिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. महिलेने पोलिसांना सांगितले की, मुलगी सकाळी आठ वाजता शाळेत गेली होती. दोन-तीन तासांनंतर ती रडत घरी आली. महिलेने तिला रडण्याचे कारण विचारले असता मुलीने शाळेत शिकणाऱ्या तीन मुलांनी तिच्या गुप्तांगाचा विनयभंग केल्याचे सांगितले.

मुलीचे बोलणे ऐकून आईच्या पायाखालची जमीन सरकली. महिलेने तत्काळ कोतवाली पोलिस ठाण्यात मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल करून ९ व ११ वर्षीय दोन्ही अल्पवयीन आरोपींना आपल्या ताब्यात घेतले, तर १४ वर्षीय आरोपी पसार झाला. पोलिस अधीक्षक मनोज कत्याल यांनी सांगितले की, परिसरात एका ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर तिसरा अल्पवयीन आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. मुलीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.


 

Tags: Crimedehradun
Next Post
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार

शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार

ताज्या बातम्या

दुष्काळी संकटातही बंजारा तांड्यात दिवाळीचा आनंद; मंत्री गुलाबराव पाटलांकडून शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही
जळगाव जिल्हा

दुष्काळी संकटातही बंजारा तांड्यात दिवाळीचा आनंद; मंत्री गुलाबराव पाटलांकडून शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही

November 8, 2026
भगवान धन्वंतरींचे पूजन व स्तवन पठण; आरोग्यसेवेचा संकल्प
जळगाव जिल्हा

भगवान धन्वंतरींचे पूजन व स्तवन पठण; आरोग्यसेवेचा संकल्प

November 8, 2026
दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप
जळगाव जिल्हा

दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप

November 7, 2026
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण
आरोग्य

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड
जळगाव जिल्हा

शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड

November 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add