जळगाव शहरातील ढाकेवाडी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : एक महिन्यापासून आपल्या मुलीकडे गेलेल्या महिलेच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांचा तांबे पितळाचे भांडे असा एकूण ७२ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की डाकेवाडी परिसरात राहणाऱ्या कमल गोपाल तेली (वय ७२) या येथे राहायला आहेत.
त्या गेल्या महिनाभरापासून आपल्या मुलीकडे गेलेल्या असताना त्यांच्या बंद घराचे कुलूप उघडून घरातून चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, चार तोळ्याची पोत, पाच तोळ्याच्या पाटल्या, एक ग्रॅमचे नाणे, दोन ग्रॅम सोन्याचे तुकडे, चांदीची चैन, चांदीचे वेल, चांदीचे देव, चांदीचे दोन भाराचे तुकडे तसेच पितळी तांबे, कळशी, घागर, तांब्याचे फिल्टर, घंटी व इतर साहित्य असा एकूण ७२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार उघडकीस आल्याने महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि राजेंद्र उगले करीत आहेत.