• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कळमसरेच्या मयत हिराबाई भील यांच्या वारसास चार लाखाची मदत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 23, 2021
in जळगाव जिल्हा
0
कळमसरेच्या मयत हिराबाई भील यांच्या वारसास चार लाखाची मदत

गजानन पाटील | अमळनेर, दि. 23 – तालुक्यातील कळमसरे येथील मोतीलाल भील यांच्या पत्नी हिराबाई मोतीलाल भिल या ३१ मे रोजी जीर्ण झालेल्या सार्वजनिक शौचालयात शौचास गेल्या असता भींत अंगावर पडून जागीच ठार झाल्या होत्या. दरम्यान त्यांच्या वारसास गुरूवारी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत चार लाखांचा धनादेश आमदारांचा हस्ते सुपूर्द करण्यात आला.

नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मयत हिराबाई भील यांचे पती मोतीलाल भील यांना चार लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. आमदार अनिल पाटील यांनी याकामी पाठपुरावा करुन कुटूंबाला मदत मिळवून दिली. मोतीलाल भील व त्यांच्या परिवाराने आमदार अनिल पाटील तहसीलदार मिलिंद वाघ तसेच स्थानिक प्रशासनाचे आभार मानले.

यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ, नायब तहसीलदार योगेश पवार, श्याम अहिरे, कळमसरेचे सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्र राजपूत, नगरसेवक भाईदास महाजन, दीपक पाटील, दिनेश पाटील, विनोद सोनवणे, किशोर मालचे आदिंच्या उपस्थिती होती.

राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेच्या माध्यमातून यांनाही मदत..
आशाबाई बापू भिल (मांडळ),
कविता सुक्रम वंजारी (डांगर),
कन्हैयालाल काशीनाथ पाटील (वासरे),
सुरेखा शाम कोळी (अमळगाव),
कमलाबाई राजेंद्र भिल (शिरूड),
शोभा ज्ञानेश्वर पाटील (अमळनेर),
मंगलबाई सजन पाटील (खडके),
जनाबाई शांताराम मोरे (अमळगाव),
अलका अशोक मोरे (पातोंडा),
अनिताबाई ईश्वर पाटील (मुंगसे)
आदी वारसांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत प्रत्येकी २० हजारांचे धनादेश आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.


 

Tags: Mla anil patilअमळनेर
Next Post
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत महिलांसाठी विविध स्पर्धा संपन्न

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत महिलांसाठी विविध स्पर्धा संपन्न

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 26, 2026
विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाची अमळनेर, जळगावात धडक कारवाई
गुन्हे

विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाची अमळनेर, जळगावात धडक कारवाई

August 26, 2026
पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पातोंडा शिवारातून खताच्या बॅगा लांबवणारी टोळी जेरबंद ; ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 26, 2026
कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!
गुन्हे

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!

August 26, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 26, 2026
वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add