• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संतांच्या आशीर्वाद प्रेरणा देतात : आ. राजूमामा भोळे

प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येत किर्तन सोहळा, दिव्य श्रीराम कथा महोत्सवाला उपस्थिती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 19, 2024
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
संतांच्या आशीर्वाद प्रेरणा देतात : आ. राजूमामा भोळे

जळगाव (प्रतिनिधी) : संतांचे आशीर्वाद प्रेरणा देतात. सेवेतून सत्कार्य घडते. संतांचे कीर्तनातून प्रबोधन हे प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येत होत आहे हे पुंण्याचे काम आहे. प्रत्येकाने किर्तन श्रवण करून सात्विक होण्याचे भाग्य घ्यावे असे आवाहन जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी केले.

उत्तर प्रदेशातील प्रभू श्रीरामचंद्र यांचे जन्मस्थान अयोध्या येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अयोध्या येथे भगवान प्रभू श्रीरामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच दिव्य श्रीराम कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवामध्ये बेळी येथील श्रीक्षेत्र कुंडलेश्वर येथील हभप भरतजी महाराज पाटील हे भाविकांना मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत. या ठिकाणी सोमवार दि. १९ ऑगस्ट रोजी शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी सदिच्छा भेट देऊन संत महाराजांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी राजू मामा भोळे यांनी अयोध्या मध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतले. तसेच दिव्य श्रीराम कथा महोत्सवाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी आमदार भोळे यांच्या हस्ते महाआरती झाली. त्यावेळी बोलताना आ. राजूमामा भोळे म्हणाले की, कीर्तन व कथा महोत्सवातून भारतीय संस्कृतीचा अभिमानास्पद वारसा पुढे जात आहे.

अयोध्या मध्ये कीर्तन सप्ताहामुळे आपल्याला मोठे पुंण्य लाभत आहे. हभप भरतजी महाराज यांचे प्रवचन मोलाचे आहे. महाराजांच्या वाणीतून साक्षात परमेश्वराचे आशीर्वाद आपल्याला लाभत आहे असेही आ. भोळे म्हणाले. किर्तन सोहळा व कथा महोत्सवाला महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून भाविक उपस्थित झालेले आहेत. आयोजन सद्गुरु झेंडूजी महाराज बेळीकर दिंडी परंपरा फड पुरस्कृत आहे.

Next Post
दुचाकी व रिक्षा चोरणारी टोळी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

दुचाकी व रिक्षा चोरणारी टोळी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add