• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बिग ब्रेकिंग ! रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला धरणात बुडून चौघे बहीण भावंडांचा मृत्यू

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 18, 2024
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र, राज्य
0
बिग ब्रेकिंग ! रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला धरणात बुडून चौघे बहीण भावंडांचा मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) : खेळायला गेलेल्या चार सख्ख्या बहीण-भाऊंचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावाच्या परिसरातील केटी वेअर धरणात रविवारी दि १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान घडली आहे. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.

चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावात बडवाणी जिल्ह्यातील सेंधवा तालुक्यातील रहिवाशी असलेले आदिवासी समाजाचे आर्य परिवार मजुरीसाठी उदय सुधाकर अहिरे यांच्याकडे आलेले आहे. त्यांच्या परिवारात ५ मुली, १ मुलगा आहेत. परिवारातील मोठी मुलगी ही भांडी घासण्यासाठी के. टी. वेअर धरणाच्या काठावर गेली होती. बहिणी सोबत जावे म्हणून रोशनी सुभाषसिंग आर्य (वय ९ वर्ष), शिवांजली सुभाषसिंग आर्य (वय ८ वर्ष), आर्यन सुभाषसिंग आर्य (वय ३ वर्ष) आराध्या सुभाषसिंग आर्य (वय ४ वर्ष, सर्व रा. दुगणी तहसील ता. सेंधवा जिल्हा बडवणी) ही चार मुले रविवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास सोबत गेली.

धरणाच्या पाण्याजवळ गेले असताना त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात बुडाले. चारही सख्खे बहीणभाऊ बुडाल्याने ग्रामस्थांनी पोलिसांना तात्काळ कळविले. ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक संदीप पाटील हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पाण्यातून मृतदेह काढून पंचनामा करण्यात आला आहे. मृतदेह चाळीसगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. मंदार करंबळेकर यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. यावेळी पावरा परिवाराचा मन हेलावणारा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते. अचानक घडलेल्या घटनेमुळे पावरा कुटुंबावर मोठा आघात कोसळला आहे. घटनेबद्दल चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला रात्री उशिरा नोंद करण्याचे काम सुरु होते.

Tags: chalisgaonCrime
Next Post
निष्णात हृदयरोग तज्ञ डॉ. सुभाष चौधरी यांचे निधन

निष्णात हृदयरोग तज्ञ डॉ. सुभाष चौधरी यांचे निधन

ताज्या बातम्या

महावितरणचे आवाहन: गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ‘स्मार्ट’ सौरऊर्जा योजना
जळगाव जिल्हा

महावितरणचे आवाहन: गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ‘स्मार्ट’ सौरऊर्जा योजना

May 24, 2026
‘तो’ फोन ठरला संजीवनी! जळगावात मृत्यूच्या दारातून डॉक्टरांनी रुग्णाला आणले खेचून..
आरोग्य

‘तो’ फोन ठरला संजीवनी! जळगावात मृत्यूच्या दारातून डॉक्टरांनी रुग्णाला आणले खेचून..

May 23, 2026
आचारसंहितेमुळे जळगाव महापालिकेत ‘प्रशासन राज’; नगरसेवकांचा नाशिक दौरा रद्द
जळगाव जिल्हा

आचारसंहितेमुळे जळगाव महापालिकेत ‘प्रशासन राज’; नगरसेवकांचा नाशिक दौरा रद्द

May 23, 2026
दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, ४ मोटारसायकली हस्तगत
गुन्हे

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, ४ मोटारसायकली हस्तगत

May 23, 2026
मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम; ३ दिवसांत ५० हून अधिक रुग्णांची तपासणी
आरोग्य

मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम; ३ दिवसांत ५० हून अधिक रुग्णांची तपासणी

May 23, 2026
विद्यार्थिनीवर अत्याचार; भावाला मारण्याची धमकी देत केला प्रकार
गुन्हे

विद्यार्थिनीवर अत्याचार; भावाला मारण्याची धमकी देत केला प्रकार

May 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group