कसारा (वृत्तसंस्था ) : नाशिक मुंबई लेनवरील कसारा घाटात सिन्नरहून मुंबईकडे दूध घेऊन निघालेले टँकर खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ५ जण ठार झाले तर ४ जण गभीर जखमी झाले आहेत. घाट उतरत असताना चालकाचे बल्कर पॉईंटजवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टँकर थेट २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळला. उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, महामार्ग चे डी वाय,एस्.पी.प्रदीप मैराळ, कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव, महामार्ग चे पोलीस अधिकारी यांनी धाव घेऊन परिस्थितीची पहाणी केली.
जखमींना नरेंद्र महाराज रुग्णवाहिकेतून व १०३३ टोल रुग्णवाहिकेतून कसारा व इगतपुरी सरकारी रुग्णालयात् पाठवण्यात आले, तर मृत व्यक्तींना खासगी रुग्णवाहिकेतून कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले.आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, दत्ता वाताडे, देवा वाघ, जास्विंदर सिंग, नाना बोऱ्हाडे, बाळू मांगे, पप्पू सदगीर, कैलास गतिर यांनी टोल कंपनी पेट्रोलिंगचे कर्मचारी सुरज आव्हाड, सचिन भडांगे, समीर चौधरी, शिवा कातोरे, देविदास म्हसणे, संदिप म्हसणे, हिरामण पराड, राजेंद्र मोरे ,विठोबा भागडे यांचे मदतीने ५ मृतदेह व ४ जखमींना बाहेर काढले.
मृतांमध्ये १) विजय घुगे, वय साठ वर्ष राहणार निमोण तालुका संगमनेर २) आरती जायभाय, वय 31 वर्ष राहणार नालासोपारा ३) सार्थक वाघ वय, 20 वर्ष रा. निहळ तालुका सिन्नर ४) रामदास दराडे, वय पन्नास वर्ष रा. निहळ तालुका सिन्नर व चालक 5) योगेश आढाव, रा. राहुरी या पाच व्यक्ती मयत झाले आहेत. या अपघातात जखमींपैकी १)अक्षय विजय घुगे, वय तीस वर्षे रा. निमोन तालुका संगमनेर २)श्लोक जायभाय, वय पाच वर्ष रा. नालासोपारा ३) अनिकेत वाघ, वय २१ वर्ष रा. निहळ तालुका सिन्नर ४) मंगेश वाघ, वय पन्नास वर्षे रा. निहळ तालुका सिन्नर हे जखमी असून त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा व उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे आणण्यात आले आहे.