• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बदलापूर आर्ट गॅलरीत जळगावमधील कलावंतांच्या गणेश कलाकृती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 22, 2021
in जळगाव जिल्हा
0
बदलापूर आर्ट गॅलरीत जळगावमधील कलावंतांच्या गणेश कलाकृती

जळगाव दि.22 – ठाणे परिसरातील बदलापूरच्या प्रसिद्ध आर्ट गॅलरीमध्ये मान्यवर कलावंतांच्या सोबतीला जळगावच्या कलावंतांनी साकारलेल्या कलाकृती भाविकांना पाहता येत आहेत. जलरंग, ड्राय पेस्टल, अॅक्रलिक अशा विविध माध्यमांतून गॅलरीमध्ये 122 च्यावर गणेशाच्या कलाकृती अवतरल्या आहेत. यामध्ये वैविध्यपूर्ण, कलात्मक आणि कल्पक अशा पाच जळगावकरांच्या कलाकृतींचाही समावेश आहे.

चित्रकार आणि चित्रकला, शिल्पकलेला प्रोत्साहन देण्यासाठी बदलापूर आर्ट गॅलरीने हा उपक्रम राबविला आहे. गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या या प्रदर्शनात महाराष्ट्रातील अनेक दिवंगत, ज्येष्ठ आणि नव्या दमाच्या कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश करण्यात आल्याचे गॅलरीचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी सांगितले.

कोल्हापूर येथील आबालाल रहेमान यांनी साकारलेले गणपतीचे चित्र ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्याकडून गॅलरीसाठी उपलब्ध झाले, ते चित्र या प्रदर्शनात आहे. तसेच बद्रीनारायण, संभाजी कदम, ग.ना.जाधव यासारख्या दिवंगत चित्रकारांनी रेखाटलेली सुबक चित्रे नव्या पिढीला कळावीत यासाठी या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. यासह ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, सुहास बहुलकर, श्रीकांत जाधव, विजयराज बोधनकर, प्रतिमा वैद्य, कैलास संन्याल या प्रसिद्ध कलावंतांच्याही कलाकृती यामध्ये आहेत.

कलाक्षेत्रातील मान्यवरांसोबत जळगावमधील चित्रकार राजू बाविस्कर, शाम कुमावत, यशवंत गरूड यांच्यासह जैन इरिगेशनच्या आर्ट विभागातील चित्रकार विजय जैन, आनंद पाटील यांच्या वैविध्यपूर्ण, कलात्मक आणि कल्पक अशा कलाकृती बदलापूर आर्ट गॅलरीमध्ये अवतरल्या आहेत. जळगावमधील कलावंतांसाठी ही बाब भूषणावह आहे. मंगलमूर्तीच्या विविध रूपांच्या रंगरेषांच्या गणेश कलाकृतींचे प्रदर्शन दि.9 ते 25 सप्टेंबरपर्यंत पाहता येणार असून सायंकाळी 5 ते 9 यावेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे.


 

Next Post
युवासेनेच्या शीतल देवरुखकर-शेठ दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर

युवासेनेच्या शीतल देवरुखकर-शेठ दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर

ताज्या बातम्या

महादेव, डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात शस्त्र, साहित्य पूजन
जळगाव जिल्हा

महादेव, डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात शस्त्र, साहित्य पूजन

October 22, 2026
भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर
जळगाव जिल्हा

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर

October 22, 2026
जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी
जळगाव जिल्हा

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी

October 21, 2026
प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी
गुन्हे

प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी

October 21, 2026
गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
गुन्हे

गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

October 21, 2026
सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार
खान्देश

सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार

October 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add