नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणाऱ्या मनू भाकरला क्रीडा मंत्रालयाने ३० लाख रूपयांचे बक्षीस दिले आहे. क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची आज भेट घेतली. त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल व प्रोत्साहनाबद्दल खूप आभार. त्यांच्या अविरत प्रयत्नांनी देशाचे खेळाडू आणखी उंच शिखरावर पोहोचतील अशी मला खात्री आहे, असे मनू भाकरने कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला आतापर्यंत केवळ तीन पदके जिंकता आली आहेत. या तीन कांस्य पदकांपैकी दोन पदके मनू भाकरने जिंकली. त्यामुळे मनू भाकर अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली.
पॅरिसच्या धरतीवर तिरंगा फडकावणाऱ्या मनूचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आता युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मनू भाकरला तिच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील कामगिरीबद्दल मोठे बक्षीस दिले. मनू भाकरने केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली. मनू भाकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली.