जळगाव (प्रतिनिधी ) भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसाचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांचे गुरुवार, 8 ऑगस्ट रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, 9 रोजी सकाळी नऊ वाजता पाडळसे येथील राहत्या घरापासून निघणार आहे.
रमेशदादा पाटील यांना वंश परंपरागत पद्धतीने 1969 साली लेवा पंचायतीच्या कुटुंबनायक पदाची धुरा मिळाली व तब्बल सुमारे 55 वर्ष त्यांनी या पदावर राहून समाजातील कौटुंबिक कलहाचा न्यायनिवाडा करण्याचे काम केले. रमेश दादा पाटील यांच्या रुपाने लेवा पाटील समाजातील एक खूप मोठे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
कुटुंबनायक रमेशदादा पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. अलीकडच्या काळात पंचायतीच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा त्यांचे चिरंजीव ललित पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
कुटूंब नायब रमेशदादा यांनी त्यांच्या कार्यकाळात पंचायतीच्या माध्यमातून अनेकांच्या कुटूंबात आलेले वितुष्ट दूर करीत दाम्पत्यात मनोमिलन घडवून आणले शिवाय त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पाडळसे येथे भोरगाव लेवा पंचायतीचे मोठे अधिवेशन पार पडले तर अनेक सामूदायीक विवाह सोहळेही त्यांच्या उपस्थितीत झाले.